वेर्णा येथे गॅस सिलिंडरने भरलेला ट्रक पलटला

Dainik gomantak
गुरुवार, 28 मे 2020

या ट्रकमध्ये १४ किलो वजनाचे एकूण २८० गॅस सिलिंडर होते, तर १९ किलो वजनाचे २० सिलिंडर होते. अपघाताची माहिती मिळताच वेर्णा अग्निशामक दलाचे अधिकारी दामोदर जांबावलीकर आपल्या जवानांसह घटनास्थळी दाखल होऊन खबरदारीचे उपाय केले. सिलिंडरमधून गॅस गळती होऊ नये, म्हणून उपाययोजना तयार ठेवली होती. अधिकारी श्री.जांबावलीकर यांनी सर्व सहकाऱ्यासह सिलिंडर सुरळीत असल्याची खातरजमा केली.

कुठठाळी,  : कुंडईहून वेर्णा गोदामाकडे निघालेला एच.पी. सिलिंडरने भरलेला ट्रक क्रमांक जी. ए. ०६ टी. ३३२८ आज संध्याकाळी ४.३० वा. वेर्णा येथील बगल मार्गाकडे चालकांचा वाहनावरील ताबा सुटल्याने शेतात उलटला व मोठा अनर्थ होण्यापासून टळला. सुदैवाने चालक बचावला.
या ट्रकमध्ये १४ किलो वजनाचे एकूण २८० गॅस सिलिंडर होते, तर १९ किलो वजनाचे २० सिलिंडर होते. अपघाताची माहिती मिळताच वेर्णा अग्निशामक दलाचे अधिकारी दामोदर जांबावलीकर आपल्या जवानांसह घटनास्थळी दाखल होऊन खबरदारीचे उपाय केले. सिलिंडरमधून गॅस गळती होऊ नये, म्हणून उपाययोजना तयार ठेवली होती. अधिकारी श्री.जांबावलीकर यांनी सर्व सहकाऱ्यासह सिलिंडर सुरळीत असल्याची खातरजमा केली. हा अपघात संध्याकाळी ४.३० वाजता घडला. वेर्णा पोलिसांनी या अपघाताची नोंद केली.     

संबंधित बातम्या