Ponda Truck Parking Issue: धारबांदोड्यात होणार ट्रक टर्मिनल; रवी नाईकांची घोषणा

बेतोडा बायपास आणि ढवळीजवळ असल्याने रस्त्याच्या कडेला ट्रकचे पार्किंग वाढत असून त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे.
Truck Parking
Truck ParkingDainik Gomantak

फोंडा: संजीवनी साखर कारखाना परिसरातील 2 लाख चौरस मीटर सरकारी जमीन नॅशनल फॉरेन्सिक सायन्सेस विद्यापीठाला नुकतीच देऊ केल्यानंतर, कृषीमंत्री रवी नाईक यांनी गुरुवारी जाहीर केले की, धारबांदोरा येथील सुमारे 2 लाख चौरस मीटर जमीन साखर कारखाना उभारण्यासाठी वापरण्यात येणार आहे तसेच याठीकाणी एक ट्रक टर्मिनल करण्यात येणार आहे.

(Ponda Truck Parking)

Truck Parking
Goa Government: 'राम राज्य' नव्हे, हे तर 'रम राज्य' अमरनाथ पणजीकरांची जहरी टीका

बैठकीनंतर नाईक म्हणाले की, फोंडा येथे शेकडो परिवहन कार्यालये असून, त्यातील बहुतांश कार्यालये बेतोडा बायपास आणि ढवळीजवळ असल्याने रस्त्याच्या कडेला ट्रकचे पार्किंग वाढत असून त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. अपघातही घडत असल्याने त्याचा विचार करून सर्व परिवहन कार्यालये शहरापासून दूर एकाच ठिकाणी स्थलांतरित करण्याचा शासनाचा विचार आहे.

ट्रक मालकांच्या निधीचा वापर

“धारबांदोरा येथील संजीवनी साखर कारखान्याच्या परिसरात सरकारची मोठी जमीन (14 लाख चौरस मीटर) असून, त्यातील 2 लाख चौरस मीटर ट्रक टर्मिनलसाठी वापरण्याचा सरकारचा विचार आहे.” असे रवी नाईक म्हणाले. ठेवींच्या माध्यमातून ट्रक मालकांच्या निधीचा वापर करून ते बांधले किंवा विकसित केले जातील आणि सरकार त्यांना फक्त जमीन देईल, असे मंत्री म्हणाले. या बैठकीला कृषी संचालक, फोंडा व धारबांदोडाचे उपजिल्हाधिकारी, फोंडा पोलीस निरीक्षक व इतर अधिकारी यांच्यासह परिवहन कार्यालय मालकांची उपस्थिती होती.

Truck Parking
Goa Congress: राज्यात पेटलेल्या आरक्षणाच्या मुद्द्यावर काँग्रेसचे शिष्टमंडळ राज्यपालांची घेणार भेट

दरम्यान, शनिवारी झालेल्या अपघातात मुर्डी खांडेपार येथील रहिवासी ट्रक अपघातात ठार झाल्यामुळे कुर्टी खांडेपार ग्रामस्थांनी खांडेपार परिसरात महामार्गाशेजारी ट्रक पार्क करण्यास मज्जाव केला आहे. महामार्गावर पार्क केलेले जवळपास सर्व ट्रक काढून टाकण्यात आले आहेत, तर नवीन ट्रकला उभे करण्यास परवानगी नाही आणि ट्रक दिसताच स्थानिक लोकांनी कारवाईचा इशारा दिला आहे.

नो पार्किंग झोनचे फलक

स्थानिकांना पाठिंबा देत कुर्टी खांडेपार ग्रामपंचायतीने गुरुवारी फोंडा-बेळगाव महामार्गालगत खांडेपार आणि बेतोडा बायपास रोडवर ट्रकना पार्किंगपासून रोखण्यासाठी नो पार्किंग झोनचे फलक लावले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com