महाराष्ट्रातून बेकायदेशीरपणे गोव्यात रेती वाहतूक करणारे ट्रक ताब्यात

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021

कुडाळ-महाराष्ट्रातून बेकायदेशीरपणे गोव्यात रेती वाहतूक करणारे चार ट्रक कुंडई - फोंड्यात काल दुपारी पकडण्यात आले. फोंड्यातील मामलेदारांनी फोंडा पोलिसांच्या सहकार्याने ही कारवाई केली.

फोंडा :  कुडाळ-महाराष्ट्रातून बेकायदेशीरपणे गोव्यात रेती वाहतूक करणारे चार ट्रक कुंडई - फोंड्यात काल (सोमवारी) दुपारी पकडण्यात आले. फोंड्यातील मामलेदारांनी फोंडा पोलिसांच्या सहकार्याने ही कारवाई केली. स्थानिकांनी या बेकायदा रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकांसंबंधीची माहिती पोलिस व मामलेदारांना दिल्यानंतरच ही कारवाई करण्यात आली. या चार ट्रकांपैकी तीन ट्रकांत एकूण 36 क्‍युबिक मिटर रेती होती. चौथ्या ट्रकवर कारवाई सुरू होती. कुडाळ - महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररीत्या रेतीची वाहतूक सर्रासपणे सुरू असल्याचे यापूर्वीही काही नागरिकांनी फोंडा पोलिसांना कळवले होते.

गोव्यात 64 गुन्हेगारांच्या तडिपारीसाठी हालचाली सुरू

काल दुपारी महाराष्ट्र शासनाची वाहतूक नोंदणी असलेला एक ट्रक रेती घेऊन येताना दिसल्यावर स्थानिकांनी तो अडवला व पोलिस तसेच फोंडा मामलेदारांना त्याची माहिती दिली. त्यानंतर महाराष्ट्रातून रेती घेऊन येणारे अन्य ट्रक सापडले. हे ट्रक रेती घेऊन फोंडा मार्गे वास्कोला जात होते. फोंड्याचे मामलेदार राजेश साखळकर यांनी फोंडा पोलिसांच्या सहकार्याने ही कारवाई केली. मामलेदारांनी पोलिसांसह घटनास्थळी येऊन रेतीची वाहतूक करणारे एमएच-07 एजी-5208, एमएच-12 8499, एमएच-06 बीडी-0394 व एमएच-07 एक्‍स-1261 या क्रमांकाचे चार ट्रक ताब्यात घेण्यात आले.

कोरोना नियंत्रणात ठेवण्यास गोवा सरकारच्या आरोग्य खात्याला यश

या प्रकरणाचा पुढील तपास फोंडा पोलिस करीत आहेत. गोव्यातील रेतीवर बंदी आणि महाराष्ट्रातील रेती बिनधास्तपणे गोव्यात वाहतूक करीत असल्याने स्थानिक रेती व्यावसायिकांनी तीव्र संताप व्यक्त केली असून प्रशासकीय यंत्रणा महाराष्ट्रातील रेती वाहतूकदारांना का अभय देते, असा सवाल करण्यात आला आहे. दरम्यान, गोव्यातील रेती व्यवसाय कायदेशीर करा, आणि रेती व्यावसायिकांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न सोडवा अशीही मागणी करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या