साखळीत घरावर कोसळला आम्रवृक्ष

या घटनेत भैरव नार्वेकर यांच्या घराची मागच्या बाजूने मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून बाजूच्या डॉ. शेट्ये यांच्या घराच्या छपराची काही प्रमाणात पडझड झाली.
साखळीत घरावर कोसळला आम्रवृक्ष
Sanquelim साखळीत घरावर कोसळला आम्रवृक्ष Dainik Gomantak

डिचोली: जोगड्याची-साखळी (Sanquelim) येथे घरावर भलामोठा आम्रवृक्ष कोसळून मोठ्या प्रमाणात पडझड झाली. ही घटना मंगळवारी मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत भैरव नार्वेकर यांच्या घराची मागच्या बाजूने मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून बाजूच्या डॉ. शेट्ये यांच्या घराच्या छपराची काही प्रमाणात पडझड झाली.

Sanquelim साखळीत घरावर कोसळला आम्रवृक्ष
युतीबाबत काय ते ठरवा, अन्यथा माझा निर्णय घेईन!

या घटनेत एक लाखाहून अधिक रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही विपरीत घटना घडली नाही. घटनेची माहिती मिळताच डिचोली अग्निशमन दलाचे अधिकारी श्रीपाद गावस यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधिकारी मुकुंद गवंडी यांच्या नेतृत्वाखालील जवानांच्या पथकाने मदतकार्य हाती घेतले.

Related Stories

No stories found.