नववधू प्रमाणे सजू लागली तुळशी वृंदावने!

डिचोलीत 'व्हडली दिवाळी'ची लगबग, सोमवारपासून तुळशीविवाह.
नववधू प्रमाणे सजू लागली तुळशी वृंदावने!
MarriageDainik Gomantak

डिचोलीत (Bicholim) सर्वत्र 'व्हडली दिवाळी' अर्थातच तुळशी विवाहाच्या तयारीची लगबग सुरु झाली असून, घरोघरी तुळशी वृंदावनेही 'नववधू'प्रमाणे सजू लागली आहेत. सोमवारपासून घरोघरी तुळशी विवाह (Marriage) लावण्यात येणार आहेत. तुळशी विवाहाने दिवाळीचा उत्साह मावळणार आहे. डिचोलीत बहूतेक भागात ब्राह्मणांच्या साक्षीत तुळशीविवाह लावण्याची परंपरा आहे.

हिंदू धर्मात तुळशीला पापनाशिनी म्हणून अनन्यसाधारण महत्त्व आहे. विष्णूचा तुळशीशी विवाह (Marriage) लावण्याचा पूजोत्सव म्हणजेच तुळशी विवाह सोहळा. कार्तिक द्वादशीपासून पौणिमेपर्यंत एखाद्या दिवशी तुळशी विवाह करता येत असले, तरी मुख्यत: द्वादशीलाच हा सोहळा करतात. तुळशी विवाह हे एक व्रत मानले गेले आहे. हे व्रत केल्याने कर्त्याला कन्यादानाचे फल मिळते. असे मानले जाते.

Marriage
उशाला कळसा तरीही पिसुर्ले वासीयांचा घसा कोरडा..!

विवाहाचे सामान बाजारात

डिचोलीत बहूतेक भागात येत्या सोमवारी तुळशी विवाह साजरा करण्यात येणार आहे. तुळशी विवाहासाठी लागणारा ऊस, चिंच, आवाळे, दिणो, झेंडूची फुले आदी साहित्य बाजारात दाखल होऊ लागले आहे. डिचोली बाजारात डिचोली आणि सत्तरी तालुक्यासह कर्नाटकातील काही भागांतून हे सामान विक्रीस उपलब्ध होत असते. बाजारातील गणपती पूजन मंडपात तुळशी विवाहासाठी लागणाऱ्या वस्तूंचा बाजार भरत असतो. उद्यापर्यंत हा बाजार सामानाने पूर्ण फुलून जाणार आहे.

तुळशी वृंदावने सजली

तुळशी विवाह म्हटला, की घरोघरी अंगणातील तुळशी वृंदावनांची साफसफाई करून त्यांची रंगरंगोटी करून नवा साज देण्यात येतो. सध्या सर्वत्र तुळशी वृंदावने रंगविण्याची लगबग सुरु आहे. लहान मुलेही ही कामे करताना दिसून येत आहे. काही तुळशी वृंदावने रंगरंगोटी करून सजली आहेत.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com