थोरल्या दिवाळीसाठी लागणाऱ्या सामानाने वास्कोतील बाजारपेठ फुलली

दैनिक गोमंतक
गुरुवार, 26 नोव्हेंबर 2020

मोठ्या दिवाळीसाठी लागणाऱ्या सामानाने वास्कोतील बाजारपेठ फुलून गेली. खरेदीसाठी लोकांची झुंबड उडाली. गेल्या वर्षापेक्षा यंदा प्रत्येक वस्तूंचा दामदुप्पट दरात.

दाबोळी : मोठ्या दिवाळीसाठी लागणाऱ्या सामानाने वास्कोतील बाजारपेठ फुलून गेली. खरेदीसाठी लोकांची झुंबड उडाली. गेल्या वर्षापेक्षा यंदा प्रत्येक वस्तूंचा दामदुप्पट दरात.

उद्यापासून तुळशी विवाहाला प्रारंभ होणार असून त्यासाठीची तयारी लोकांनी तुळशीवृंदावन रंग काम केल्यानंतर आता तुळशी विवाहाच्या पूर्वतयारीला लोकांनी आज बाजारात एकच गर्दी केली होती. तुळशी विवाहसाठी लागणारे ऊस, चिंच, आवळा, जोडवी व इतर जिन्नस विक्रीस उपलब्ध होते. ऊस प्रति नग पन्नास रुपये, आवळा, चिंच दिणस मिळून पन्नास रुपये असे दरात विक्रीस उपलब्ध होते. गेल्या वर्षी सगळे जिन्नस ७० रुपयाला मिळत होते.

ते यंदा शंभर रुपये दरात लोकांना घ्यावे लागले. तसेच चुरमुरे, फटाके, रांगोळी इतर साहित्यही बाजारात उपलब्ध होते. लोकांनी दरात कोणतीही वाटाघाटी न करता गप्प राहून सामान घेणे पसंत केले. दरम्यान तुळशीवृंदावन विवाहासाठी सज्ज झाली असून दुपारी तुळशीस हळद काढून व नैवेद दाखवल्यानंतर संध्याकाळी तुळशी विवाह प्रारंभ होणार आहे.
 

संबंधित बातम्या