साळपे तळ्यातील सांडपाणी बंद करा - प्रतिमा कुतिन्हो 

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 13 एप्रिल 2021

मडगावमधील बिल्डर लाॅबीच्या हितासाठी राजकीय नेत्यांनी या तळ्याचा बळी दिला असा आरोप कुतिन्हो यांनी यावेळी केला.

मडगाव : मडगाव व नावेलीच्या सीमेवर असलेल्या साळपे तळ्यात वाहणारे सांडपाणी बंद करून या तळ्यास गतवैभव प्राप्त करून द्यावे व  शेतकऱ्यांना पुन्हा शेती करण्यास पोषक स्थिती निर्माण करावी अशी मागणी आम आदमी पार्टीच्या (आप) नेत्या अॅड. प्रतिमा कुतिन्हो यांनी केली. कुतिन्हो यांनी आज स्थानिक शेतकऱ्यांसह साळपे तळ्यास भेट दिली. मडगावमधील बिल्डर लाॅबीच्या हितासाठी राजकीय नेत्यांनी या तळ्याचा बळी दिला असा आरोप कुतिन्हो यांनी यावेळी केला. काही वर्षांपूर्वीपासून मडगाव शहरातील सांडपाणी या तळ्यातील नाल्यातून वाहू लागले. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती सोडावी लागली. शेतकरी या ठिकाणी कलिंगडे, रताळी, अळसांदे, कांदे व भाज्यांचे पीक घेत असत. पण, तळे प्रदुषित झाल्याने शेतकऱ्यांनी शेती सोडली असे कुतिन्हो यांनी सांगितले. 

स्थानिक आमदार लुईझीन फालेरो यांनी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना पत्रेच लिहिली. तळ्याची स्थिती सुधारण्यासाठी प्रत्यक्षात कोणतीच कृती केली नाही. बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव यांना साळ नदीतील गाळ उपसण्यात केवळ आपल्या स्वार्थासाठी रस आहे, असा आरोपही त्यांनी केला. साळ नदीतील गाळ उपसून नदीतील पाण्याचे प्रदूषण थांबणार नाही. त्यासाठी साळपे तळ्यातून वाहणारे सांडपाणी बंद झाले पाहिजे, असे कुतिन्हो यांनी सांगितले. (Turn off the sewage from the Salpe pond - pratima Cutinho)

गोव्यातील आमठाणे धरण फुल्ल; पण मगरीचा वावर असल्याने भीती

नागमोडे येथील रस्त्याची स्थिती खराब झालेली आहे. साळपे तळ्याच्या बांधावरच्या रस्त्याच्या बाजुला कचरा फेकण्यात येत आहे. हा प्रकारही बंद झाला पाहिजे. आपकडून हे प्रश्न धसास लावण्यात येणार आहे, असे कुतिन्हो यांनी सांगितले. मलनिस्सारण व्यवस्थेला आमचा विरोध नाही. पण, तळ्यातील पाण्याचे प्रदूषण थांबले पाहिजे असे एका शेतकऱ्याने सांगितले. 

संबंधित बातम्या