Porvorim News : कृत्रिम हातांना मेंदूचे बळ; 25 दिव्यांगांना मिळणार अत्याधुनिक हात

येत्या काही दिवसांत कृत्रिम हात बसवले जाणार
Prosthetic fitting and assistance camp for differently-abled persons was organized at Porvorim
Prosthetic fitting and assistance camp for differently-abled persons was organized at PorvorimDainik Gomantak

Porvorim News: दिव्यांग 25 व्यक्तींना लवकरच अत्याधुनिक (prosthetic hands) प्रोस्थेटिक हात मोफत दिले जाणार आहेत. मायोलेक्ट्रिक असलेले हे हात मेंदूद्वारे नियंत्रित केले जातील असे राज्याच्या दिव्यांग विभागाचे आयुक्त गुरुप्रसाद पावसकर यांनी सांगितले. (Prosthetic fitting and assistance camp for differently-abled persons was organized at Porvorim)

दिव्यांगांना स्वतंत्रपणे जगता यावे यासाठी राज्य आयुक्त कार्यालयातर्फे संजय स्कूल, पर्वरी येथे दिव्यांग व्यक्तींसाठी आयोजित दोन दिवसीय कृत्रिम अवयव बसवणे आणि सहाय्यता शिबिरात ही घोषणा करण्यात आली.

Prosthetic fitting and assistance camp for differently-abled persons was organized at Porvorim
Smart Signals in Goa : वाहनचालकांनो सावधान! गोव्यात मार्चपासून स्मार्ट सिग्नल्स आणि हायटेक कॅमेरे

शिबिरादरम्यान वैद्यकीय सहायक्कांमार्फत प्राथमिक तपासणी करण्यात आली. प्रत्येक कृत्रिम हाताची किंमत अंदाजे 1.5 लाख रुपये आहे. येत्या काही दिवसांत ते कृत्रिम हात बसवले जातील.

"ज्यांना हात नाहीत, अपघातात हात गमावले आहेत किंवा काम करताना ते गमावले आहेत त्यांना नवीन मेंदू-नियंत्रित मायोइलेक्ट्रिक हाताचा खूप फायदा होईल. या कृत्रिम हातांमुळे दिव्यांग व्यक्तिंना यापुढे दैनंदिन कामांसाठी इतरांवर अवलंबून राहावे लागणार नाही" असे पावसकर म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com