डिचोलीतील आमठाणे धरणात बुडाला राजस्थानी युवक

Twenty five year old Rajasthani tourist goes missing in Amthane dam in Dicholi
Twenty five year old Rajasthani tourist goes missing in Amthane dam in Dicholi

डिचोली: सगळीकडे नववर्षाचा उत्साह संचारला असतानाच,  डिचोलीतील आमठाणे धरणाच्या पाण्यात पंचवीस वर्षीय पर्यटक युवक बेपत्ता होण्याची घटना घडली आहे. संबंधित युवकाच्या मित्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा युवक धरणा च्या पाण्यात बुडाल्याचे स्पष्ट झाले आहे.  पाण्यात बुडालेला युवक राजस्थानमधील असून, त्याचे नाव जीतूकुमार जाधव असे आहे.  ही घटना काल शुक्रवारी (ता. १) सायंकाळी उशिरा घडल्याची माहिती मिळाली आहे. धरणात बुडालेल्या युवकाचा काल सायंकाळपासून शोध जारी असून, अद्याप त्याचा थांगपत्ता लागलेला नाही. 


यासंबधी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नववर्ष साजरे करण्यासाठी काल (शुक्रवारी) सायंकाळी राजस्थानमधील पाच युवकांचा एक गट आमठाणे धरणावर आला होता. त्यापैकी तीन युवक आंघोळीसाठी धरणाच्या पाण्यात उतरले. आंघोळीची मजा लुटताना अचानक जीतूकुमार पाण्यातच बेपत्ता झाला.  हा प्रकार लक्षात येताच सोबतच्या युवकांवर आकांत आला. त्यांनी या प्रकाराची माहिती डिचोली पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा करून डिचोली अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. 


अग्निशमन दलाचे अधिकारी श्रीपाद गावस यांच्या मार्गदर्शनाखाली दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन बोटीच्या मदतीने उशिरापर्यंत बेपत्ता युवकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. आमठाणे धरणात पर्यटक युवक बुडण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे समजते.


(शनिवारी) दुसऱ्या दिवशी  पुन्हा शोध मोहीम जारी करण्यात आली. नौदलाच्या पथकालाही पाचारण करण्यात आले. दोन्ही अग्निशमन आणि नौदलाच्या जवानांकडून सायंकाळी उशिरापर्यंत शोध मोहीम जारी होती. या धरणाची  पातळी खोल असल्याने बेपत्ता युवकाचा शोध घेताना अनेक अडचणी येत असल्याचे समजते. दुसऱ्या बाजूने या धरणात मगरींचा संचार आहे. त्यामुळे अनेक तर्कवितर्क वर्तविण्यात येत आहेत. हा युवक मगरीच्या जबड्यात तर मिळाला असावा. असा अंदाजही व्यक्त करण्यात येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com