गोव्यात कोरोना बळींची संख्या ६९७ वर

दैनिक गोमन्तक
रविवार, 6 डिसेंबर 2020

आज राज्यात एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती गोवा आरोग्य खात्याने दिली.

पणजी: आज राज्यात एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती गोवा आरोग्य खात्याने दिली. यामुळे राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या मृत्यूचा आकडा ६९७  इतका झाला आहे. राज्यातील कोरोनाची स्थिती आता सुधारत असून सध्याचा राज्यातील रिकव्हरी रेट ९५.७२ टक्के इतका आहे. 

आज ज्यांचा मृत्यू झाला ते कुंकळ्ळी येथील ७० वर्षीय महिला होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात आज ११५ लोकांना कोरोनाची लागण झाली, तर ११८ लोक कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यभरात एक हजार तीनशे चौऱ्यांशी कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. आज ज्या रुग्णांना लागण झाली, त्यातील ८२ लोकांनी होम आयसोलेशनचा मार्ग  स्वीकारला, तर इस्पितळात उपचार करण्यासाठी ४३ लोकांना भरती करून घेण्यात आले. गेल्या चोवीस तासांत दोन हजार त्र्यानव कोरोना पडताळणी चाचण्या करण्यात आल्या.

आणखी वाचा:

संबंधित बातम्या