हरमल समुद्रकिनाऱ्यावर वीस हजार रुपयाचे अंमली पदार्थ जप्त

हरमल समुद्रकिनाऱ्यावर वीस हजार रुपयाचे अंमली पदार्थ जप्त
Twenty thousand rupees worth of drugs seized at Harmal beach in Goa

पणजी: जगप्रसिद्ध अशा हरमल समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या प्रसिद्ध पिंपळाच्या झाडाखाली पोलिसांनी आज वीस हजार रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त केले. बंगळूर येथील केलसॅंग दोरजी या 41 वर्षीय नागरिकाची पोलिसांनी संशयावरून झडती घेतली असता त्याच्याकडे चरस आणि गांजा सापडला.

पोलीस निरीक्षक जिवबा दळवी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. त्या परिसरात अंमली पदार्थांचा व्यापार चालतो अशी खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली होती. यामुळे पोलिसांनी सायंकाळपासूनच त्या परिसरात पाळत ठेवली होती.

अखेर दोरजी याला संशयाने हटकले आणि त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे चरस व गांजा सापडला. तो त्याने पर्यटकांना विक्रीसाठी आणला असावा असा पोलिसांचा कयास आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com