Goa Accident : शुक्रवार ठरला अपघातवार; रस्ते अपघातात दोघांचा बळी

चिंबल जंक्शनवर कदंब बसच्या धडकेत सायकलस्वाराचा मृत्यू; तर उसगावात अज्ञात वाहन धडकल्याने महिलेचा अंत
Goa Accident
Goa Accident Dainik Gomantak

Goa Accident : राष्ट्रीय महामार्गावरील चिंबल जंक्शन अपघातप्रवण ठरत आहे. आज पहाटे सहाच्या सुमारास कदंब बसने या जंक्शनवर सायकलस्वाराला धडक दिल्याने त्याचा जागीच ठार झाला. तर उसगाव येथे अज्ञात वाहनाने ठोकरल्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाला. चिंबल येथे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव देऊ म्हार्दोळकर (५९ वर्षे) असे असून ते इंदिरानगर-चिंबल येथील रहिवासी आहेत. कदंब चालक रूपेश मुरगुडकर याला जुने गोवे पोलिसांनी अटक केली आहे.

जुने गोवे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे व्हाया मडगाव-फोंडा ते पणजी ही कदंबची आंतरराज्य प्रवासी बस पणजीच्या दिशेने येत होती. ही बस उतरणीवर पोहचली असता चिंबल येथून रायबंदर पाटोकडे जाण्यासाठी जंक्शनवर सायकलस्वार रस्ता ओलांडत असताना या बसची जोरदार धडक बसली. यात देऊ म्हार्दोळकर यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली. रक्तस्रावही मोठ्या प्रमाणात झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती जुने गोवे पोलिसांना मिळाल्यावर अपघाताचा पंचनामा करून कदंब चालकाला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरुद्ध भादंसंच्या कलम 304 खाली गुन्हा दाखल केला आहे.

सिग्नल आहे; पण पोलिस गायब

चिंबल येथील हे जंक्शन अपघाताचे ठिकाण बनले आहे. या जंक्शनवर सिग्नल नसताना काही महिन्यांपूर्वी एका पादचाऱ्याला रस्ता ओलांडताना ठोकरले होते. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला होता. त्यावेळी स्थानिकांनी या जंक्शनवर सिग्नल सुरू करण्याची मागणी केली. या ठिकाणी सिग्नल आहे. मात्र, वाहतूक पोलिस नसतो. त्याचा फायदा घेऊन काही वाहनचालक रेड सिग्नल असतानाही थांबत नाहीत. सकाळी या जंक्शनवरून शाळेत जाणारी मुले तसेच स्थानिक दुचाकींची रहदारी असते. सिग्नलमुळे काही वाहने नियम पाळतात; मात्र काहीजण पोलिस नसल्याचे बघून थेट निघून जातात. त्यामुळे तेथे कायमस्वरूपी पोलिस तैनात करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.

Goa Accident
Goa Accident : चिंबल जंक्शनवर कदंब बसच्या धडकेत सायकलस्वाराचा बळी

उसगावातील नेस्ले कंपनीसमोरील रस्त्यावर शुक्रवारी पहाटे अज्ञात वाहनाने ठोकरल्याने नाव अनघा आनंद देसाई (वय 44) ही महिला ठार झाली. ती मूळची गडहिंग्लज (जि. कोल्हापूर) येथील असून कुटुंबासोबत तिस्क - उसगाव येथे भाड्याच्या खोलीत राहात होती. सकाळी कामाला जाण्यासाठी ती बाहेर पडली असता अज्ञात वाहनाने तिला ठोकरले. वाहनचालकाने अपघातानंतर पलायन केले. फोंडा पोलिसांनी पंचनामा केला असून अज्ञात वाहनाच्या शोधात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com