आके परिसरात पार्क केलेली दुचाकी चोरल्याप्रकरणी दोघांना अटक

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2020

आके परिसरात पार्क केलेली दुचाकी चोरल्याप्रकरणी मडगाव पोलिसांनी कारवाई करून फरार संशयित रोहित लोट (१९) याला अटक केली. 

सासष्टी : आके परिसरात पार्क केलेली दुचाकी चोरल्याप्रकरणी मडगाव पोलिसांनी कारवाई करून फरार संशयित रोहित लोट (१९) याला अटक केली. 
संशयित लोट यांनी ही चोरी सराईत गुन्हेगार सत्य तोमर (वय २५) याच्या सांगण्यावरून केल्याचे पोलिसांना कळाल्यावर तोमर यालाही अटक करण्यात 
आली. 

मडगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  आके परिसरात अनिल फार्मसीजवळ पार्क केलेली दुचाकी चोरल्याप्रकरणात  मडगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली होती. ही दुचाकी काल फातोर्डा परिसरात रोहित लोट घेऊन फिरताना दिसून आल्यावर मडगाव पोलिसांनी त्याची चौकशी करून त्यालाअटक केली. 

लोट यांनी ही चोरी सराईत गुन्हेगार सत्य तोमर याच्या सांगण्यावरून केल्याचे पोलिसांना कळाल्यावर मडगाव पोलिसांनी आज तोमर याला नावेली येथून त्याच्या घरातून अटक केली. तोमर याच्याविरुद्ध दुचाकी चोरीप्रकरणात अनेक गुन्हे असून त्याला अनेकदा अटकही करण्यात आलेली आहे. 

संबंधित बातम्या