कोलवाळ पोलिसांवर हल्‍ल्‍याचा प्रयत्‍न करणाऱ्या दोघांना अटक

शुभम सुभाष केणी (28, कासारवर्णे-पेडणे) आणि हर्ष प्रेमानंद आरोंदेकर (20, वळपे-विर्नोडा) अशी आरोपींची नावे आहेत.
कोलवाळ पोलिसांवर हल्‍ल्‍याचा प्रयत्‍न करणाऱ्या दोघांना अटक
Goa Crime NewsDainik Gomantak

म्हापसा : कोलवाळ पोलिसांशी हुज्जत घालून त्यांच्‍यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी दोघा दुचाकीस्वारांना अटक केली आहे. शुभम सुभाष केणी (28, कासारवर्णे-पेडणे) आणि हर्ष प्रेमानंद आरोंदेकर (20, वळपे-विर्नोडा) अशी त्‍यांची नावे आहेत. ही घटना आज दुपारी बाराच्या सुमारास घडली.

तक्रारदार पोलिस हवालदार नरेंद्र नाईक यांच्यासह चौघेजण पोलिस कर्मचारी कोलवाळ पुलाजवळ वाहतूक कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी तैनात होते.

Goa Crime News
‘दिव्यांग’ विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारल्याच्या तक्रारी

यावेळी संशयित भरधाव वेगाने मोटारसायकल वरून आले. त्यांना पोलिसांनी थाबविले तेव्हा संशयितांनी आम्हाला अडविणारे तुम्ही कोण? असा प्रश्न करीत पोलिसांशी हुज्जत घातली. पोलिसांनी त्यांच्याकडे वाहन परवाना व क्रमांकपट्टीची विचारपूस केली, त्यावेळी संशयितांनी पोलिसांना शिवीगाळ केली व गंभीर परिणामांची धमकी दिली. तसेच भंगारातील लोखंडी सळी आणून, त्याद्वारे पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही पकडून पोलिस स्थानकावर आणून रितसर अटक केली. दोन्ही संशयितांविरोधात पोलिसांनी दोघाही संशयितांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. संशयितांना अटक केली असून, तपास पोलिस उपनिरीक्षक मंदार परब हे करीत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com