
वाळपई: होंडा सत्तरी या ठिकाणी काल रविवारी चार वाजताच्या सुमारास दारू पिऊन धिंगाणा घालीत काही तरुणांनी पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्या निषेधार्थ पेट्रोल पंपावरील कर्मचारी व स्थानिक तरुणांनी होंडा पोलीस चौकीवर मोर्चा नेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.
(Two arrested in case of beating workers at petrol pump in honda)
रात्री उशिरापर्यंत या संदर्भाची मागणी मोर्चेकरीनी लावून धरली होती. उपस्थित पोलिसांनी सदर मारणकर्त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ते रात्री उशिरापर्यंत ते सापडू शकले नव्हते.त्यानंतर आज सोमवारी उशिरा कादर शेख,सलिम चोरात (राहणार बिठ्ठोण) दोघांना ताब्यात घेतले आहे.
रविवारी अज्ञात इसमानी पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यावर हल्ला करून त्याला मारहाण
करण्याचा प्रयत्न केल्यानंतर संतप्त नागरिकांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली होती. मात्र हल्लेखोर न सापडल्यामुळे रात्री उशिरापर्यंत स्थानिकांनी या संदर्भात होंडा पोलीस चौकीवर ठाण मांडून या संदर्भाची मागणी केली होती. जोपर्यंत त्याला अटक होत नाही तोपर्यंत पोलीस ठाणे सोडणार नसल्याचा इशारा देण्यात आला होता. याची दखल घेऊन आज सोमवारी दिवसभर वाळपई पोलिसांनी केलेल्या कारवाईत कादर शेख,सलिम चोरात (राहणार बिठ्ठोण) या दोघांना ताब्यात घेतले आहे.
सध्या तर त्यांना वाळपई पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले आहे .मात्र त्यांना होंडा येथील पोलीस चौकीवर आणावे व आमच्या ताब्यात द्यावे अशा प्रकारची मागणी यावेळी स्थानिकांनी लावून धरली होती.
सदर दोघांनाही आज संध्याकाळी होंडा पोलीस चौकीवर आणावे यासाठी स्थानिकांनी पुन्हा एकदा आक्रमक रूप धारण केले. सदर दोन्ही संशयितांना आमच्या ताब्यात करा आम्ही त्यांना जाब विचारून त्यांची धुलाई करू अशा प्रकारची मागणी करण्यात आली होती.
यासाठी पुन्हा एकदा होंडा पोलीस स्थानकावर स्थानिकांनी जमाव करून या संदर्भाची मागणी केल्यानंतर तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे.
दरम्यान तणावाची परिस्थिती असल्याची दखल घेऊन वाळपई मामलेदार कौशिक देसाई यांनी घटनास्थळी धाव घेऊन यावेळी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी त्यांचा त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र स्थानिकांनी आपली मागणी लावून धरल्यामुळे रात्री उशिरापर्यंत पोलीस स्थानकावर तणावाची परिस्थिती कायम होती.
यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला
यावेळी पोलिस डीएसपी सागर एकोस्कर यांनी स्थानिकांशी चर्चा करताना सांगितले की आपल्या कायद्याबाहेर जाऊन कुठलेही पाऊल उचलणार नाही. दोघा संशयताना अटक केली असुन त्यांना कायद्याप्रमाणे शिक्षा होणार आहे. आणि वाळपई पोलिस स्थानिक सोडून त्याना होंडा आऊट पोस्टवर आणता येत नाही. त्यामुळे सर्वांनी कायद्याचे उल्लंघन करु नये.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.