स्वप्नील वाळके खूनप्रकरणी क्राईम ब्रँचकडून २४ तासांत दोघांना अटक

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 3 सप्टेंबर 2020

मडगाव शहरात काल भरदिवसा सराफी दुकानाचा मालक स्वप्नील वाळके याचा चाकूने भोसकून खून केलेल्या प्रकरणातील तिघांपैकी दोघाना क्राईम ब्रँचने रात्री उशिरा उटक केली.

पणजी: मडगाव शहरात काल भरदिवसा सराफी दुकानाचा मालक स्वप्नील वाळके याचा चाकूने भोसकून खून केलेल्या प्रकरणातील तिघांपैकी दोघाना क्राईम ब्रँचने रात्री उशिरा उटक केली. अटक केलेल्यांची नावे ओमकार पाटील व एडसन गोन्साल्विस अशी आहेत. तिसरा संशयित मुस्तफा शेख सध्या फरारी असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. 

मडगावातील कृष्णी या सोन्याच्या दागिन्यांच्या दुकानात चोरी करण्याच्या उद्देशाने हे तिघेही आले होते. या तिघांनी स्वप्नील याच्यावर गावठी बनावटीच्या रिव्हॉल्वर (कट्टा) व चाकूने हल्ला केला. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. त्याने जखमी अवस्थेत दोघांना पकडून ठेवण्याचा प्रयत्न केला मात्र ते त्याच्या तावडीतून निसटून पसार झाले. त्याला मडगावातील हॉस्पिसिओ इस्पितळात नेण्यात आले असता त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा छडा लवकरच लावण्याचे निर्देश दिल्यानंतर पोलिसांनी काल रात्रीच दोघांच्या मुसक्या आवळल्या. 

या घटनेचे चित्रकरण एका व्यक्तीने मोबाईलमध्ये केले होते त्याची मदत घेत पोलिसांनी ही कारवाई केली त्यात यश आले. अटक केलेल्या दोघा संशयितांना क्राईम ब्रँचने मडगाव पोलिसांच्या स्वाधीन पुढील तपासासाठी दिले आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या