Margao : अपघातांचे सत्र सुरुच; दोन दुचाकींची समोरासमोर धडक, एकाचा मृत्यु

दुसरा दुचाकीस्वार इस्पितळात दाखल
accident
accidentDainik Gomantak

Margao : गेले काही दिवस राज्यातील अपघातांचं सत्र सुरूच आहे. अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. दुचाकी-चारचाकी वाहनांसोबत ट्रक, बसेस या मोठ्या वाहनांचे अपघातही मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्यामुळे राज्यातून चिंता व्यक्त केली जातेय. राज्यातील वाढत्या अपघातांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिस विभाग आणि संबंधित यंत्रणांकडून विविध उपाययोजना आखण्यात येतायत.

accident
Mahadayi Water Dispute: मंत्रिमंडळाचे 4 महत्वाचे निर्णय; गरज पडल्यास मोदी-शहांना भेटणार

नवीन वर्षांत सुरू झालेली अपघाती मृत्यूंची मालिका अजूनही कायम आहे. सोमवारी रात्री साडेसातच्या सुमारास येथील मुंगुल फ्लायओव्हर जवळ दोन दुचाकींची समोरासमोर टक्कर होउन अपघात घडला आहे. या अपघातात कासावली येथील युवकाचा जागीच मृत्यु झाला आहे तर दुसरा दुचाकीस्वार हा जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आपले काम संपवून आग्नेल फर्नांडीस (३९) हा युवक घरी जात होता. यावेळी मुंगुल फ्लायओव्हर जवळ आला असता समोरून आलेल्या दुचाकीची आग्नेल याला जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात आग्नेल गंभीर जखमी झाला. तर दुसरा दुचाकीस्वार सचिन शिंदे हाही जखमी झाला. जखमी अवस्थेत जिल्हा इस्पितळात नेण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी आग्नेल फर्नांडीस याला मृत जाहीर केले. दुसरा दुचाकीस्वार सचिन शिंदे याला इस्पितळात दाखल करण्यात आले. आग्नेल याच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com