डिचोली बाजारात पैशांच्या व्यवहारातून दोन भावांमध्ये हाणामारी

अनपेक्षित प्रकारामुळे लोक भयभीत होऊन बाजारातून पांगले. काही दुकानदारानींही आपल्या दुकानांची शटरे खाली केली.
डिचोली बाजारात पैशांच्या व्यवहारातून दोन भावांमध्ये हाणामारी

डिचोली बाजारात पैशांच्या व्यवहारातून दोन भावांमध्ये हाणामारी

Dainik Gomantak

डिचोली: पैशांच्या व्यवहारातून काल बुधवारी डिचोलीत (Bicholim) साप्ताहीक बाजारात (Market) लमाणी भाजी विक्रेत्यांच्या दोन गटात झालेल्या हाणामारीमुळे बाजारात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. संध्याकाळी अचानकपणे घडलेल्या या अनपेक्षित प्रकारामुळे बाजारातील लोक भयभीत होऊन बाजारातून पांगले. काही दुकानदारानींही आपल्या दुकानांची शटरे खाली केली.

या प्रकारामुळे बाजारात आणि परिसरात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून, दहशत निर्माण करणाऱ्या लमाणींना यापुढे डिचोली बाजारात बसण्यास प्रतिबंध करावा. अशी मागणी जोर धरत आहे. उपलब्ध माहितीनुसार, डिचोली बाजारात भाजी विक्रीचा धंदा करणाऱ्या बिगरगोमंतकीय दिपक राठोड व मोहन राठोड या दोघा भावांमध्ये व्यवसायातील पैशांच्या व्यवहारातून सकाळपासून वादावादी झाली.

<div class="paragraphs"><p>डिचोली बाजारात पैशांच्या व्यवहारातून दोन भावांमध्ये हाणामारी</p></div>
वेर्णा पोलिसांनी अन्वर शेख हत्या प्रकरणाचा 72 तासांत केला उलगडा

सकाळीही त्यांच्यात तुरळक वादावादी झाली होती. त्यावेळी इतरांनी मध्यस्थी करून सदर प्रकरण मिटविले होते. परंतु संध्याकाळी बाजार चालूच असताना सदर वादाचे रूपांतर भांडणात झाले. संध्याकाळी बाजार ग्राहकांच्या गर्दीने फुलला होता. नेमके त्याच वेळी दोन्ही गटातील लोकांनी बाजारात येऊन हाणामारी करीत अक्षरशः दहशत माजवली. भाजी वजन काट्यावरील वजने तसेच हातात शस्त्रे घेऊन मोठे भांडण बाजारात झाले. यावेळी बाजारात उपस्थित लोकांची एकच तारांबळ उडाली. कुठे काय चालले आहे ते समजण्यापलिकडे लोकांची धावपळ उडाली. लोकांनी सदर हाणामारी पाहून बाजार परिसर खाली केला. काही दुकानदारांनी आपल्या दुकानांची शेटरे खाली खेचली. सुदैवाने मारामारी करणाऱ्यांनी फेकून मारलेली वजने कुणा नागरिकांना लागली नाही.

<div class="paragraphs"><p>डिचोली बाजारात पैशांच्या व्यवहारातून दोन भावांमध्ये हाणामारी</p></div>
कुठ्ठाळी जंक्शनजवळ कदंब बसला मोठी आग

या प्रकरणाची माहिती डिचोली पोलिसांधा मिळताच पोलिसांनी तत्काळ बाजारात धाव घेत हाणामारी करणाऱ्या दोघाही भावांना आणि त्यांच्या साथीदारांना ताब्यात पोलीस स्थानकात आणून चौकशी केली. मात्र दोघांकडूनही या विषयी तक्रार नोंद करण्यात आली नसल्याने पुढील पोलीस कारवाई झाली नाही. परंतु झालेल्या प्रकाराबध्दल दिपक राठोड व मोहन राठोड यांना कडक समज देऊन सोडण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com