ब्रिटनमधून आलेले ते दोघे कोरोना निगेटिव्ह

दैनिक गोमन्तक
गुरुवार, 31 डिसेंबर 2020

कालपर्यंत ३२ आणि आज ११ असे ४३ लाळेचे नमुने पुणे येथील व्हायरॉलॉजी लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यातील दोघांचे अहवाल हाती आले

पणजी: राज्यात ९ डिसेंबर २०२० नंतर ९०० हुन अधिक लोक ब्रिटनमधून आले आहेत. यातील ३७ जण आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह आले असून या लोकांच्या संपर्कात आलेले २३ लोक पॉझिटिव्ह आले आहेत. 
कालपर्यंत ३२ आणि आज ११ असे ४३ लाळेचे नमुने पुणे येथील व्हायरॉलॉजी लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यातील दोघांचे अहवाल हाती आले असून हे दोन्ही अहवाल नवीन स्‍वरुपातील कोरोनाबाबत निगेटिव्ह आले असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज 
दिली. 
राज्यात बाकीच्या अहवालांची अद्याप प्रतीक्षा आहे. दरम्यान या रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती आरोग्य खात्यातून मिळाली. 
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील रिकव्हरी रेट ९६.७२ टक्के इतका आहे. राज्यभरात ९३१ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. आज ७० लोकांनी होम आयसोलेशनचा मार्ग उपचारासाठी स्वीकारला तर इस्पितळात उपचार करण्यासाठी ३७ लोकांना भरती करून घेण्यात आले. १९६१ इतक्या कोरोना पडताळणी चाचण्या करण्यात आल्या. राज्यात नववर्षानिमित्त पर्यटकांची गर्दी वाढत असल्याने सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून घराबाहेर पडण्याची गरज पुन्हा एकदा व्यक्त होऊ लागली आहे.

आज दोघांचा मृत्यू 
राज्यात आज दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे राज्यात आजवर मृत्यू झालेल्या लोकांची संख्या ७३७ इतकी झाली आहे. आज ज्यांचा मृत्यु झाला त्यांच्यामध्ये फोंडा येथील ७२ वर्षीय पुरुष आणि काणकोण येथील ८५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. 

आणखी वाचा:

गोव्यातही रात्रीची संचारबंदी लागू करण्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंतांची वाटचाल -

संबंधित बातम्या