डिचोली पालिकेच्या वाहनाला मये येथे अपघात

प्रतिनिधी
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020

डिचोली पालिकेच्या मोटारगाडीला मये येथे झालेल्या भयानक अपघातात दोन नगरसेवकांसह चालक सुदैवाने बचावला. हा अपघात आज (सोमवारी) दुपारी मये-वण्ण्यार येथील ‘सात मायेची बसका’ देवस्थान परिसरातील धोकादायक वळणावर घडला. 

डिचोली: डिचोली पालिकेच्या मोटारगाडीला मये येथे झालेल्या भयानक अपघातात दोन नगरसेवकांसह चालक सुदैवाने बचावला. हा अपघात आज (सोमवारी) दुपारी मये-वण्ण्यार येथील ‘सात मायेची बसका’ देवस्थान परिसरातील धोकादायक वळणावर घडला. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, डिचोली पालिकेच्या नगराध्यक्षांच्या मोटारगाडी घेवून उपनगराध्यक्ष कुंदन फळारी आणि नगरसेवक अजित बिर्जे हे सोमवारी अग्निशमन दलाशी संबंधित कार्यालयीत कामानिमित्त पणजी येथे गेले होते. काम आटोपून दुपारी डिचोलीत परतत असताना मये-वण्ण्यार येथे हा अपघात घडला. समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देताना चालकाचे स्टेअरींगवरील नियंत्रण गेले आणि मोटारगाडी तीन कोलांट्या खात रस्त्याच्या बाजूने खोल भागात कोसळली. मोटारगाडी ‘आबो’ नामक चालक चालवित होता, अशी माहिती मिळाली आहे. या अपघातात मोटारीची बरीच मोडतोड झाली. तर मोटारीतील तिघांनाही मुका मार बसला. पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला. goa

संबंधित बातम्या