पणजीत दोन दिवसीय राष्ट्रीय काजू संमेलनाला सुरूवात

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021

काजू व कोको विकास संचालनालय तसेच गोवा कृषी खाते व गोवा फलोत्पादन महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने पणजीत आज दोन दिवशीय राष्ट्रीय काजू संमेलन सुरू झाले.

पणजी: काजू व कोको विकास संचालनालय तसेच गोवा कृषी खाते व गोवा फलोत्पादन महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने पणजीत आज दोन दिवशीय राष्ट्रीय काजू संमेलन सुरू झाले. या संमेलनाचे उद्‍घाटन गोवा कृषी सचिव कुलदीप सिंग गांगर यांनी केली. देशातील काजू लागवडीसाठी काजू उत्पादन क्षेत्रातील शेतकऱ्यांनी विविध प्रकारच्या काजू पिकासाठी प्रयत्न करावेत.

देशातील काजू कारखान्यांसाठी आवश्‍यक प्रमाणात काजू उत्पादन होत नसल्याने काजू आयात करावे लागतात. सुमारे १५ दशलक्ष टन काजू पिकाची गरज असताना देशात सुमारे 7 ते 8 टन दशलक्ष काजू उत्पादन होते. एकेकाळी भारत देश काजू उत्पादनात पहिल्या क्रमांकावर होता तो आता दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. हे स्थान पुन्हा मिळवण्यासाठी वर्षभर काजू पिक घेण्यासाठी विविध प्रकारच्या जातीच्या काजू पिकासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे असे मत आयसीएआर - सीसीएआरआय गोवाचे संचालक ई. बी. चाकुरकर यांनी व्यक्त केले.

गोव्यातील पंचायत सचिव पदांसाठी होणारी लेखी परीक्षा येत्या रविवारी 

यावेळी काजू व कोको विकास संचालनालयाचे सचिव एस. के. मल्होत्रा यांनी केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत अंतर्गत नव्या उद्योजकानी या क्षेत्रात येऊन काजू लागवडीचे उत्पादन वाढ करण्यास सहकार्य करावे. नव्या व अत्याधुनिक यंत्रणाचा व संशोधनाचा वापर करून काजू उत्पादन मोठ्या प्रमाणात तयार करावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी काजू लागवडीच्या क्षेत्रात यशस्वी शेतकऱ्यांना या संमेलनात व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्हे देऊन गौरविण्यात आले. यामध्ये कर्नाटक, महाराष्ट्र व गोव्यातील काजू लागवड नर्सरी तसेच शेतकऱ्यांचा समावेश होता.

जायफळ फलावरण टॉफी उत्पादन प्रक्रियेमधील  ICAR CCARI तंत्रज्ञानाचं व्यावसायिकीकरण होणार 

संबंधित बातम्या