मडगावात आढळले दोन मृतदेह, परिसरात खळबळ

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे
मडगावात आढळले दोन मृतदेह, परिसरात खळबळ
Two Death bodies found in Margao police area Danik Gomantak

फातोर्डा : मडगाव पोलीस स्थानकाच्या हद्दीत दोन भिकाऱ्यांच्या अनैसर्गिक मृत्य झाल्याची पोलीस स्थानकात नोंद झाली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हा मृत्यू नेमका कसा झाला याची अद्याप माहिती मिळाली नाही. मात्र मडगाव पोलीस याचा तपास करत आहेत. (Two Death bodies found in Margao police area)

यातील एक रेल्वे स्टेशनवर जाण्याच्या मार्गावर असलेल्या सुलभ शाैचालयाच्या परिसरात मृतदेह आढळला असून याचे वय अंदाजे 40 ते 45 वर्ष असे आहे. दुसरा मृतदेह खारेबानंद या परिसरात सापडला आहे. याचे वय अंदाजे 60 ते 65 असे असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या दोघांचा मृतदेह दक्षिण गोवा जिल्हा हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आला आहे. मात्र या मृतांची ओळख पटली नसून ते परप्रांतीय असण्याची शक्यता आहे. या विषयी मडगाव पोलीस स्थानकाकडून पुढील तपास करण्यात येत आहे.

Two Death bodies found in Margao police area
'राज्यात मानवी तस्करी खपवून घेणार नाही, गृहमंत्र्यांसोबत करणार चर्चा'

दरम्यान, राज्‍यात दिवसेंदिवस विविध प्रकारच्‍या गुन्ह्यां‍मध्ये वाढ होत आहे. गेल्‍या अडीच महिन्‍यांत राज्‍यातील पोलिस ठाण्यात विविध प्रकारच्‍या जवळपास 40 प्रकरणांची नोंद झाली असून, यात चोरी, मारामारी, अमलीपदार्थ विक्री, सामाजिक माध्यमांद्वारे फसवणूक, दारूची तस्‍करी, आयपीएल सट्टा, बेकायदा कॅसिनो, बनावट नोटा आदींचा समावेश आहे.

गेल्‍या अडीच महिन्‍यात उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा अशा दोन्‍ही जिल्ह्यांत 13 चोऱ्यांच्‍या घटना घडल्‍या आहेत. तर अमलीपदार्थ प्रकरणी 10 गुन्‍हे नोंद झाले आहेत. मार्च महिन्‍याच्‍या सुरुवातीला पणजीतील एका कुरिअर कंपनीतून 1.37 लाख रुपयांच्‍या तब्बल 107 मोबाईलची चोरी झाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.