धक्कादायक! ठणटणीत झाल्यावरही गोमेकॉच्या दोन डॉक्टरांना पुन्हा कोरोनाची लागण

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 5 ऑक्टोबर 2020

कोरोनामधून बरे झाल्यावर या दोनही डॉक्टरांनी परत कामावर रूजू होत कोरोना रूग्णांवर उपचार करायला सुरूवात केली होती. दोन्ही बाधित डॉक्टरांचे वय 30 वर्षांखालील असल्याने त्यांना विशेष धोका नसून ते गोवा वैद्यकीय महाविद्यालयातच उपचार घेत आहेत. 

पणजी- जूनमध्ये कोरोना होऊन गेल्यावरही गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या दोन डॉक्टरांना परत कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनामधून बरे झाल्यावर या दोनही डॉक्टरांनी परत कामावर रूजू होत कोरोना रूग्णांवर उपचार करायला सुरूवात केली होती. दोन्ही बाधित डॉक्टरांचे वय 30 वर्षांखालील असल्याने त्यांना विशेष धोका नसून ते गोवा वैद्यकीय महाविद्यालयातच उपचार घेत आहेत. 

याबाबत अधिक माहिती देताना गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवानंद बांदेकर म्हणाले की, डॉक्टरांना कोरोना होऊन गेल्यावर परत बाधित होण्याची ही पहिलीच घटना आहे. आमच्या चमूत कोणतीही भीतीदायक स्थिती नाही. आम्हाला पूर्ण खात्री आहे की हा कोरोना महामारीचाच एक भाग आहे. आम्हाला त्याला तोंड द्यावे लागेल.      

संबंधित बातम्या