Shigmo Parade : गोव्यात शिगमो मिरावणुकीवेळी दोन गटात तुफान राडा; एकजण गंभीर जखमी

हे प्रकरण पुढे वाढत गेले आणि त्यांनी मिरावणुकीसाठी बनवलेल्या चित्ररथाची मोडतोडही केल्याचे सांगण्यात येत आहे.
Two groups fight during Shigamo parade one seriously injured
Two groups fight during Shigamo parade one seriously injuredDainik Gomantak

गोमंतकीय लोकसंस्कृती, लोककला, लोकपरंपरेचा आविष्कार घडविणाऱ्या शिगमोत्सवाची सर्वचजण आतुरतेने वाट बघत असतात. सध्या गोव्यात सगळीकडे शिगमोत्सवाचे वातावरण आहे. काल पणजीमध्ये शिगमो मिरवणूक पार पडली. ‘घणचे कटर घण’ ‘ओस्सय ओस्सय’ने पणजी शहर दुमदुमले आहे. मात्र अशातच सणाला गालबोट लागेल अशी घटना घडली आहे. (Two groups fight during Shigamo parade one seriously injured)

Two groups fight during Shigamo parade one seriously injured
Goa Shigmotsav 2023 : ‘घणचे कटर घण’ ‘ओस्सय ओस्सय’ने पणजी दुमदुमली

शिगमोत्सवाच्या मिरावणुकीवेळी दोन गटात राडा झाला. मेरशी जंक्शनजवळ ही घटना घडली. कोणत्यातरी कारणावरून दोन गटात मारामारी सुरू झाली. हे प्रकरण पुढे वाढत गेले आणि त्यांनी मिरावणुकीसाठी बनवलेल्या चित्ररथाची मोडतोडही केल्याचे सांगण्यात येत आहे.

या मारामारीत एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला GMC मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा पोलीस पुढील तपास करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com