अडीचशे हॉटेल्‍स आजपासून खुली

Dainik Gomantak
गुरुवार, 2 जुलै 2020

पर्यटक येऊ लागल्यानंतर सॉफ्टवेअरच्या माध्यमातून त्यांना गोव्यात येण्याविषयीच्या नियम व अटी उपलब्ध होतील. राज्याच्या सिमेवरील प्रवेश मार्गावर ही सुविधा उपलब्ध असेल. त्याच ठिकाणी येणाऱ्या व्यक्तीकडे ४८ तासांत आरोग्य तपासणी केल्याचे प्रमाणपत्र आवश्‍यक आहे. तपासणी केली नसल्यास त्याला थेट हॉटेलमध्ये पाठविले जाईल. तेथून त्याची तपासणी होईल. तपासणीनंतर त्याचा अहवाल निगेटिव्‍ह आल्यानंतरच त्या व्यक्तीला बाहेर फिरता येईल. ४८ तासांच्या ऐवजी आम्‍ही २४ तासांत तपासणी अहवाल यावा, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.

पणजी :

राज्यातील हॉटेल उद्योग व्यवसाय गुरुवारपासून सुरू होईल. पर्यटन खात्याकडे २५० हॉटेलचे अर्ज दाखल झालेले आहेत. हॉटेलमध्ये आरक्षण असेल, तरच सशर्त प्रवेश मिळेल, अशी माहिती पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांनी आज सांगितले.
आजगावकर म्हणाले की, पर्यटक येऊ लागल्यानंतर सॉफ्टवेअरच्या माध्यमातून त्यांना गोव्यात येण्याविषयीच्या नियम व अटी उपलब्ध होतील. राज्याच्या सिमेवरील प्रवेश मार्गावर ही सुविधा उपलब्ध असेल. त्याच ठिकाणी येणाऱ्या व्यक्तीकडे ४८ तासांत आरोग्य तपासणी केल्याचे प्रमाणपत्र आवश्‍यक आहे. तपासणी केली नसल्यास त्याला थेट हॉटेलमध्ये पाठविले जाईल. तेथून त्याची तपासणी होईल. तपासणीनंतर त्याचा अहवाल निगेटिव्‍ह आल्यानंतरच त्या व्यक्तीला बाहेर फिरता येईल. ४८ तासांच्या ऐवजी आम्‍ही २४ तासांत तपासणी अहवाल यावा, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.

बाहेरून येणाऱ्या व्यक्तीने ४८ तासांत जर आरोग्य तपासणी केलेली नसेल, तर ती करून घेणे आवश्‍यक आहे. तसेच ‘त्या’ पर्यटकांचे हॉटेल आरक्षण झालेले असावे. जर हॉटेलचे आरक्षण केलेले नसेल, तर त्याला प्रवेश मिळणार नाही. तसेच या ठिकाणी त्या व्यक्तीचे घर असणे, किंवा लगतचे पाहुणे असणे गरजेचे आहे. पर्यटन खात्याकडे जी २५० हॉटेल नोंदणी झाली आहे, त्या हॉटेलमध्ये आरक्षण केलेले असणे गरजेचे आहे.
हॉटेलमध्ये प्रवेश केल्यानंतर त्या पर्यटकास परिपूर्ण माहिती असलेला अर्ज भरावा लागणार आहे. कायदेशीररीत्या सर्व पद्धती लागू केल्या जाणार आहेत. बार ॲण्ड रेस्टॉरंट सुरू व्हावेत, असे आपणास वाटते. गोव्यात किनारे आणि मद्याला लागून पर्यटक येतात, हे मान्य आहे, असेही आजगावकर यांनी नमूद केले.

पर्यटकांना आता कायदेशीर परवानगी
गोव्यात यायचे झाल्यास पर्यटकांना आता परवानगी घ्यावी लागणार आहे. हॉटेलच्‍या आरक्षणाची नोंद खात्याकडे आल्यामुळे राज्याच्या महसुलात वाढ होणार आहे, हे पटवून देताना आजगावकर म्हणाले की, ज्या हॉटेल व्यावसायिकाला हॉटेल सुरू करावयाचे आहे, त्यांनी पर्यटन खात्याची परवानगी घेणे आवश्‍यक आहे. त्यांचा अर्ज खात्याकडे आला पाहिजे. जर कोणी बेकायदेशीरपणे आरक्षण केले असेल, तर त्या हॉटेलवर दंडात्मक कारवाई केली जाईल. पर्यटनखात्‍याने पर्यटक नोंदणी केल्‍यामुळे सुमारे ९० लाखांचा महसूल मिळाला. खात्याचे रजिस्टार नसताना १ कोटी ६० लाख पर्यटक गोव्यात येऊन गेल्यामुळे खात्याचा किती महसूल बुडाला, हे लक्षात येते असेही त्यांनी सांगितले.

 

संबंधित बातम्या