ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स घेऊन विमाने गोव्यात दाखल

Two Indian Air Force planes arrived in Goa yesterday carrying oxygen cocentrators
Two Indian Air Force planes arrived in Goa yesterday carrying oxygen cocentrators

पणजी: कोरोना संकटावर(Covid-19) मात करण्यासाठी केंद्र सरकारने(Central Government) आज गोव्याला(Goa) 323 कॉन्संट्रेटर्स(cocentrators) दिले. कोरोनाविरुद्धच्या लढाईत गोव्याला मदत करण्यासाठी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या पुढाकाराने भारतीय वायूसेनेची दोन विमाने काल ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स(oxygen cocentrators ) व अन्य वैद्यकीय साहित्यासह गोव्यात दाखल झाली. गोव्यातील वाढते कोरोनाबाधित आणि दिवसेंदिवस वैद्यकीय यंत्रणेवरील वाढता ताण यां गोष्टींचे गांभीर्य लक्षात घेऊन गोवा सरकारने  केंद्राकडे मदत मागितली होती. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक(Union Minister of State for Defense Shripad Naik) यांनी त्यादृष्टीने लागलीच पावले उचलली आणि आज वायूसेनेची दोन विमाने 323 ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स व अन्य वैद्यकीय उपकरणांसह गोव्यात पोचली. (Two Indian Air Force planes arrived in Goa yesterday carrying oxygen cocentrators)

यासंदर्भात बोलताना केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले, की गोव्यासह सर्वच राज्यांत महामारीचे मोठे संकट आले आहे. ऑक्सिजनची टंचाई सरकारची डोकेदुखी झाली आहे. दिवसेंदिवस ऑक्सिजनची गरज वाढत आहे. राज्यांच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी केंद्र सरकार सर्वप्रकारचे प्रयत्न करत आहे. भारतीय सेनेने कोरोनाविरुद्धच्या लढ्यात स्वतःला पूर्णपणे झोकून दिले असून त्यांचे मदतकार्य जोरात सुरू आहे. दोस्त राष्ट्रांनी पुरवलेल्या ऑक्सिजनसह इतर वैद्यकीय सामुग्री भारतात आणण्यात नौदल मोलाची कामगिरी बजावत आहे.

गोव्यात ऑक्सिजन प्लांटसाठी प्रयत्न सुरू
गोव्यात लवकरात लवकर ऑक्सिजन जनरेटिंग प्लांट व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. राज्य सरकारने वेळीच त्यांची गरज कळवावी. ती पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले. राज्यातील कोरोना महामारी आटोक्यात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या सर्व सहकार्याबद्दल श्रीपाद नाईक यांनी त्यांचे आभार मानले आहेत.
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com