गोमन्तकच्या पत्रकारांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020

 पत्रकारिता क्षेत्रात दिलेल्या मोलाच्या योगदानाबद्दल दैनिक गोमंतकचे ज्येष्ठ छायाचित्रकार सोरू कोमारपंत व गोमंतक टाईम्सचे माजी उपसंपादक सुरेश वाडवडेकर यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 

पणजी :   पत्रकारिता क्षेत्रात दिलेल्या मोलाच्या योगदानाबद्दल दैनिक गोमंतकचे ज्येष्ठ छायाचित्रकार सोयरू कोमारपंत व गोमंतक टाईम्सचे माजी उपसंपादक सुरेश वाडवडेकर यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 

सोमवारी पणजी येथील इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा सभागृह येथे  राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते अनमोल योगदान असणाऱ्या पत्रकारांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये अनंत साळकर, सोयरू कोमरपंत, सुरेश वडावडेकर, सुरेश नाईक, विल्फ्रेड परेरा, ज्येष्ठ पत्रकार सिताराम टेंगसे यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या समवेत  माहिता व जाहिरात विभाग प्रमुख , माहिती सचिव व गोवा युनियन ऑफ जर्नलिस्टस् चे अध्यक्ष राजतिलक नाईक उपस्थित होते.

संबंधित बातम्या