हे दोन आमदार ही कोरोनाच्या विळख्यात; चोवीस तासांत आणखी पाच बळी

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 19 ऑगस्ट 2020

राज्यात आज २९८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आणि २३१ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने राज्यात ३८६१ एवढे सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. दरम्यान, आतापर्यंत एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या १२,३३३ वर पोहोचल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली. 

पणजी: मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर, थिवीचे आमदार नीळकंठ हळर्णकर यांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्‍याची माहिती खात्रीदायक सूत्रांकडून मिळाली. राज्यात आज आणखी पाच कोविड पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे राज्यात आजवर झालेल्या कोविड पॉझिटिव्ह रुग्णांच्या मृत्यूची आकडेवारी ११६ वर पोहोचली आहे. तर राज्यात आज २९८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आणि २३१ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने राज्यात ३८६१ एवढे सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. दरम्यान, आतापर्यंत एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या १२,३३३ वर पोहोचल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली. 

मंगळवारी आणखी पाच कोविड पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला.  त्‍यामध्‍ये आके येथील ५७ वर्षीय पुरुष असून गोवा वैद्यकीय महाविद्यालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ईएसआय रुग्णालयात दाखल केलेले मडगाव येथील ७५ वर्षीय पुरुष, बोरी येथील ७२ वर्षीय पुरुष, फोंडा येथील ५७ वर्षीय पुरुष, बायणा येथील ६६ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या