गोव्यात काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बांधणी

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 1 फेब्रुवारी 2021

काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी सहा फेब्रुवारीपासून दोन महिन्याचा कार्यक्रम राबवण्यात येईल, अशी माहिती काँग्रेस राज्य समन्वय समितीचे अध्यक्ष ॲड रमाकांत खलप यांनी दिली.

पणजी: काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी सहा फेब्रुवारीपासून दोन महिन्याचा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे, अशी माहिती काँग्रेस राज्य समन्वय समितीचे अध्यक्ष ॲड रमाकांत खलप यांनी दिली.

काँग्रेसच्या राज्य समन्वय समितीची बैठक ऍड खलप आणि सह अध्यक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस भवनात झाली. या बैठकीनंतर खलप यांनी सांगितले, की काँग्रेसचे राज्य प्रभारी दिनेश गुंडु राव   येत्या 5 तारखेला गोव्यात येणार आहे. 6 तारखेला राज्य निरीक्षक, उत्तर गोवा निरीक्षक आणि दक्षिण गोवा निरीक्षकांच्या उपस्थितीत समन्वय समितीची पुन्हा एकदा बैठक होईल. या बैठकीत सुमारे 60 दिवसांचा संघटनात्मक बांधणी कार्यक्रम निश्चित केला जाईल आणि त्यानंतर त्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे.

गोवा राज्य बनावटीच्या विदेशी मद्यसाठ्यावर धाड -

हा कार्यक्रम नेमका सदस्यत्व नोंदणी मोहीम नसेल तर गट पातळीवरील समित्यांची नियुक्ती करणे, जिल्हा पातळीवरील समित्यांची नियुक्ती करणे आणि जनतेशी संवाद साधून त्यांना नेमके काय हवे हे समजून घेणे अशा स्वरूपाचा हा सर्वसमावेशक कार्यक्रम असणार आहे.

संबंधित बातम्या