गोव्यात कोरोनाचे आणखी दोन बळी; राज्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021

आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज कोरोना संसर्ग झालेले 40 नवे कोरोना रग्ण गोव्यात आढळले, तर कोरोना संसर्ग झाल्याने उपचार घेणाऱ्या 59 व्यक्ती बऱे झाले आहे.

पणजी : देशात कोरोनाची लस उपलब्ध झाली असली मागील दोन दिवसांत कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. कोरोना रूग्णसंख्येत वाढ होतांना आपल्याला दिसत आहे. गोवा राज्‍यात आज कोरोना संसर्ग झालेल्या दोन व्यक्तींचे निधन झाले आहे. आरोग्य खात्याने ही माहिती प्रसारीत केली आहे. नावेली येथील 72 वर्षांच्या आणि कासावली येथील 59 वर्षांच्या अशा दक्षिण गोव्यातील दोन व्यक्ती आज कोरोनामुळे मृत्‍युमुखी पडल्‍या.

आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज कोरोना संसर्ग झालेले 40 नवे कोरोना रग्ण गोव्यात आढळले, तर कोरोना संसर्ग झाल्याने उपचार घेणाऱ्या 59 व्यक्ती बऱे झाले आहे. आजच्या दिवशी कोरोनावर उपचार घेणाऱ्यांची संख्या 525 आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित बरे होण्याची टक्केवारी वाढत असून आज ती 97.59 वर पोहोचली आहे.

गोव्यात 15 फेब्रुवारी संध्याकाळी 6:00 पर्यंत झालेले लसीकरण

  • एकूण लसीकरण: 85,16,385
  • आरोग्यकर्मचाऱ्यांची संख्या: 61,54,894
  • 1 ली मात्रा: 60,57,162
  • 2 री मात्रा: 97,732
  • आघाडीवरील कर्मचारी संख्या: 23,61,491

 

 

महाराष्ट्र प्रशासनाची उडाली झोप

दरम्यान  देशभरात कोरोना संसर्गाची नवीन प्रकरणे कमी होत असली तरी महाराष्ट्र आणि इतर राज्यात अजूनही चिंतेचा विषय आहे. देशातील कोरोना प्रसाराच्या तुलनेत जवळपास 70 टक्के घटना या दोन राज्यांतील आहेत. महाराष्ट्राविषयी बोलायचे झाले तर महाराष्ट्रात नवीन कोरोना प्रकरणात नुकत्याच झालेल्या वाढीमुळे प्रशासनाची झोप उडाली आहे. गेल्या पाच दिवसांपासून राज्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ झाली आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात कोरोनाची दोन हजार नवीन प्रकरणे समोर आली आहे.  रविवारी राज्यात नवीन कोरोना प्रकरणांची संख्या चार हजारांच्या पुढे गेली आहे. गेल्या 40 दिवसांत ही पहिलीच वेळ आहे जेव्हा महाराष्ट्रात ही संख्या चार हजारांवर गेली आहे. महानगर मुंबईतदेखील केसेसची संख्या (मुंबईत कोरोना प्रकरणे) वाढली आहेत.

 

संबंधित बातम्या