गोव्यात कोरोनामुळे दोघांचा मृत्‍यू; १०१ जण पॉझिटिव्‍ह

दैनिक गोमन्तक
गुरुवार, 10 डिसेंबर 2020

राज्यात आज दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आजवर कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या ७०३ वर पोहोचली आहे.

पणजी : राज्यात आज दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आजवर कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या ७०३ वर पोहोचली आहे.  दरम्यान, आज १०१ लोक कोरोना पॉझिटिव्‍ह, तर १३२ जण कोरोनामुक्त झाल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली.

आज मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील रुग्‍ण बरे होण्‍याची सरासरी ९५.९६ टक्के एवढी आहे. राज्यभरात १२७७ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. आज ९० लोकांनी होम आयसोलेशनचा मार्ग उपचारासाठी स्वीकारला तर इस्पितळात उपचार करण्यासाठी ३१ लोकांना दाखल करून घेण्यात आले.

आणखी वाचा:गोव्याचे महाराष्ट्र परिचय केंद्र बंद की सुरू? सारे गुलदस्त्यात -
राज्यात १६१० एवढ्या कोरोना पडताळणी चाचण्या करण्यात आल्या. राज्यातील उत्तर गोव्यातील कोरोना केअर सेंटरची क्षमता २७५ खाटांची आहे. यातील २५६ खाटा सध्या रिकाम्‍या आहेत, तर दक्षिण गोव्यातील कोरोना केअर सेंटरची क्षमता ६० असून यातील ४९ खाटा रिकाम्‍या आहेत. सरकारकडे लोकांच्या उपचाराठी पुरेशा जागा उपलब्ध असल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली.

गोवा जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी शनिवारी मतदान ; कोरोनाच्या सावटामुळे यंत्रणेकडून रुग्णांनी पीपीई किट पुरवले जाणार -

महत्त्‍वाच्या ठिकाणी असणारे रुग्ण
पर्वरी - ८२ मडगाव - १०४ फोंडा - ६७ वास्को - ६६ 
लोटली - ३७  पणजी - ६४  
चिंबल - ४८.

संबंधित बातम्या