घरात गांजाची लागवड..!; 2 किलो गांजासह दोन रशियन अटकेत

दैनिक गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑक्टोबर 2020

संशयित घरावर छापा मारला असता तेथे गांजाच्या रोपांची बेकायदेशीर लागवड केलेली आढळून आली. पोलिसांना यावेळी अधिक शोध घेतला असता 2 किलो 5 ग्रॅम गांजाही सापडला. चौकशीत दोन्ही संशयित हे गेल्या मे महिन्यांपासून येथे घर भाड्याने घेऊन राहत होते.

पेडणे-  गावडेवाडा-मांद्रे  येथे केलेल्या कारवाईत एका घरात गांजाची रोपटी आणि गांजा मिळून साडे तीन लाख रूपयांची रोकडही जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी अॅलेक्सेइ पेरेवालेव्ह (31) व अॅलेक्सेइ रेबेरीव्ह या रशियन नागिकत्व असलेल्या दोघांना अटक करण्यात आली. तर याबाबत घर मालक सुधीर गावडे याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या ऐवजामध्ये पाच कॅराबीन कुंड्या, 2 किलो 5 ग्रॅम गांजा यांचा समावेश आहे. 

पेडणे पोलिस ठाण्याचे निरीक्षक जीवबा जळवी यांना गावडेवाडा-मांद्रे येथे एका घरात गांजाची लागवड केली जात असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यावर त्यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे एक पथक तयार करण्यात आले. संशयित घरावर छापा मारला असता तेथे गांजाच्या रोपांची बेकायदेशीर लागवड केलेली आढळून आली. पोलिसांना यावेळी अधिक शोध घेतला असता 2 किलो 5 ग्रॅम गांजाही सापडला. चौकशीत दोन्ही संशयित हे गेल्या मे महिन्यांपासून येथे घर भाड्याने घेऊन राहत होते. लागवड केलेल्या गांजाच्या रोपांची विक्री करण्यासाठीच ती घरात लावली होती. 

पोलिस निरीक्षक जीवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रफुल्ल गिरी, हरीष वायंगणकर, संजीत कांदोळक, कॉन्स्टेबल रवी माळोजी यांनी गेल्या पाच दिवसांत केलेली ही दुसरी धडक कारवाई आहे.     

संबंधित बातम्या