Fire In Calangute Beach: कळंगुट बीचवर अग्नितांडव, दोन शॅक जळून खाक...

गोव्यात आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. नुकत्याच आलेल्या माहितीनुसार कळंगुट येथील समुद्र किनाऱ्यावर पहाटे 2.45 च्या दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत दोन शॅक जळून खाक झाले आहेत.
Fir In Calangute
Fir In Calangute Dainik Gomantak

कळंगुट: गोव्यात आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. नुकत्याच आलेल्या माहितीनुसार कळंगुट येथील समुद्र किनाऱ्यावर पहाटे 2.45 च्या दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत दोन शॅक जळून खाक झाले आहेत. या घटनेमध्ये सुमारे 50 लाखांचे नुकसान झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

(Fire In Calangute Beach)

Fir In Calangute
53rd IFFI 2022: ‘चित्रपट निर्मात्यांनी महत्त्वाकांक्षी भारताची कथा सांगावी’ अनुराग सिंग ठाकूर स्पर्धकांना आवाहन

राज्यात शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याचे प्रमाण वाढत आहे. काही दिवसांपूर्वी रावणफोंड मिलिट्री कॅम्प जवळ सकाळी एका घराला आणि खाली असलेल्या दुकानांना आग लागून सुमारे 50 लाखांचे नुकसान झाले. ही आग विजेच्या शॉर्ट सर्किट मुळे लागली असावी असा प्राथमिक अंदाज काढण्यात आला आहे. या आगीत घरासह तीन दुकाने आणि चार वाहनांची हानी झाली.

मागील महिन्यात देखील कळंगुट समुद्रकिनारी असलेल्या शॅकला आग

मागील महिन्यात देखील कळंगुट सावतावाडो येथे दुपारी समुद्रकिनारी असलेल्या शॅकला आग लागली होती. आग आटोक्यात आणण्यासाठी पिळर्णे येथील अग्निशमन दलाने अथक प्रयत्न केले. ही घटना घडली तेव्हा पर्यटक शॅकमध्ये बसले होते. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. मात्र या आगीत 10 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com