चोवीस तासांत कोरोनाचे दोन बळी

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 25 ऑक्टोबर 2020

 राज्यात आज आणखी दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात आजवर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची ५७० वर येऊन पोचली आहे.

पणजी : राज्यात आज आणखी दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात आजवर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची ५७० वर येऊन पोचली आहे. आज दिवसभरात २१८ लोकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली आहे. राज्यात रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.२४ टक्के झाला असून मृत्यूदरही कमी झाल्याची माहिती गोवा आरोग्य खात्याने दिली. ही एक चांगली बाब असून होम आयसोलेशनची सुविधाही लोकांना मदतशीर ठरत आहे. गेल्या चोवीस तासात ३४८ लोक कोरोनमुक्त झाले आहेत. 

आज मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये मोबोर येथील ३० वर्षीय तरुणाचाही मृत्यू झाल्याने लोकांच्यात हळहळ व्यक्त केली जात होती. ही व्यक्ती मृतावस्थेतच हॉस्पिसिओ रुग्णालयात मध्यरात्री आणण्यात आले होते. शवविच्छेदन करताना मृत व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजले. दुसऱ्या व्यक्तीचा मृत्यू गोवा वैद्यकीय महाविद्यालयात झाला असून ६० वर्षीय हि व्यक्ती वाळपईची रहिवासी होती. आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात सध्या २६९२ सक्रीय रूग्ण आहेत.

दक्षिण आणि उत्तर गोव्यातील उलपब्ध खाटांची संख्या अद्यापही मोठ्या प्रमाणात शिल्लक असल्याने लोकांनी घाबरण्याचे कारण नाही. उत्तर गोव्यात खाटांची संख्या ४६९ इतकी असून सध्या ३३४ खाट वापरात आहेत, तर दक्षिण गोव्यात ६९२ इतकी खाटांची संख्या असून सध्या ५१० खाट वापरात आहेत. आजच्या दिवसभरात १५० लोकांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला तर ४२ लोकांना इस्पितळात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. आज दिवसभरात एक हजार पंचेचाळीस इतके लाळेचे नमुने तपासण्यात 
आले. 

संबंधित बातम्या