कोरोनाचे राज्यात दोन बळी

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 1 नोव्हेंबर 2020

 राज्यात आज दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे आजवर राज्यात झालेल्या कोरोना बळींची संख्या ६०४ इतकी झाली आहे. आज २१० रुग्णांना कोरोनाची लागण झाली, तर २६९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात २३४४ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत.

पणजी : राज्यात आज दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे आजवर राज्यात झालेल्या कोरोना बळींची संख्या ६०४ इतकी झाली आहे. आज २१० रुग्णांना कोरोनाची लागण झाली, तर २६९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात २३४४ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत.

गेल्या चोवीस तासांत राज्यात १७५६ इतक्या कोरोना पडताळणी चाचण्या करण्यात आल्या. आज ११८ लोकांनी होम आयसलेशनचा मार्ग उपचारांसाठी निवडला, तर ३८ लोकांना उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले. राज्याचा रिकव्हरी रेट ९३.२४ टक्के इतका आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डिचोली आरोग्य केंद्रात ७३ रुग्ण, साखळी आरोग्य केंद्रात ८५ रुग्ण, पणजी आरोग्य केंद्रात १४२ रुग्ण, कांदोळी आरोग्य केंद्रात १०४ रुग्ण, पर्वरी आरोग्य केंद्रात १३० रुग्ण, मडगाव आरोग्य केंद्रात २११ रुग्ण, वास्को आरोग्य केंद्रात १०३ रुग्ण, फोंडा  आरोग्य केंद्रात १३६ रुग्ण उपचारासाठी भरती आहेत. दक्षिण आणि उत्तर गोव्यातील उलपब्ध खाट शिल्लक असल्याने लोकांनी घाबरण्याचे कारण नाही. उत्तर गोव्यात खाटांची संख्या ४६९ इतकी असून सध्या १९५ खाटा शिल्लक आहेत, तर दक्षिण गोव्यात ६९२ इतकी खाटांची संख्या असून सध्या ६३० खाटा शिल्लक आहेत.

देशाचा मृत्यूदर १.४९ टक्के 
कोविड-१९ वैश्विक महामारीच्या विरोधात सामूहिक लढाईमध्ये भारताला यश मिळत आहे. या आजारामुळे भारतामध्ये मृत्यमुखी पडण्याचे प्रमाण १.५ टक्क्यांपेक्षाही कमी झाले आहे. आज भारताचा मृत्यूदर १.४९ टक्के आहे. भारतामध्ये प्रति दशलक्ष ८८ असा मृत्यूदर आहे.  भारतामध्ये ‘टेस्ट-ट्रॅक- ट्रीट’ ही उपचार रणनीती अवलंबिल्यामुळे भारताचा मृत्यूदर १.५ टक्क्यांपेक्षा खाली आला आहे. संक्रमण रोखणे तसेच मोठ्या प्रमाणावर चाचण्या करणे आणि वैद्यकीय उपचारांचे प्रमाणीकरणासह प्रभावी व्यवस्थापन करण्यात येत आहे. रुग्णांवर उपचार करताना प्रमाणित पद्धतीचा वापर करण्याकडे लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. त्यामुळे मृत्यूदर कमी होत आहे.

संबंधित बातम्या