तिस्क - उसगावात वाहनांच्या अपघातात दुचाकीस्वार ठार

वार्ताहर
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

तिस्क - उसगाव येथे कार व दुचाकीच्या जोरदार टकरीत दुचाकीस्वार ठार झाला. हा अपघात काल (शनिवारी) मध्यरात्री बाराच्या सुमारास एमआरएफ प्रकल्पाकडून तिस्क येथे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर घडला. अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव केशव सोमा गवंडा (वय २९) असे असून तो मूळ रामनगर - खानापूर (कर्नाटक) येथील असून तो सिद्धेश्‍वरनगर तिस्क - उसगाव येथे भाड्याच्या खोलीत राहत होता. 

फोंडा: तिस्क - उसगाव येथे कार व दुचाकीच्या जोरदार टकरीत दुचाकीस्वार ठार झाला. हा अपघात काल (शनिवारी) मध्यरात्री बाराच्या सुमारास एमआरएफ प्रकल्पाकडून तिस्क येथे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर घडला. अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव केशव सोमा गवंडा (वय २९) असे असून तो मूळ रामनगर - खानापूर (कर्नाटक) येथील असून तो सिद्धेश्‍वरनगर तिस्क - उसगाव येथे भाड्याच्या खोलीत राहत होता. 

एमआरएफ कंपनीत कामाला असलेला केशव गवंडा  काल रात्री कामावरून आपल्या खोलीवर परतताना तिस्कहून फोंड्याच्या दिशेने जाणाऱ्या जीए ०१ ई १५६५ या क्रमांकाच्या कारगाडीला तो चालवत असलेल्या जीए ०५ क्‍यू ०७२५ या क्रमांकाच्या मोटरसायकलची जोरदार ठोकर बसली. या जोरदार ठोकरीनिशी केशव रस्त्यावर फेकला गेला. यावेळी त्याच्या डोक्‍याला व शरीराच्या इतर भागाला गंभीर दुखापती झाल्या. रात्रीची वेळ असल्याने तो बराच वेळ रस्त्यावर पडला होता, शेवटी रुग्णवाहिकेतून त्याला प्रथम पिळये येथील आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले, मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला अधिक उपचारासाठी बांबोळी इस्पितळात नेले जात असतानाच त्याचे वाटेतच निधन झाले. 

या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या कारगाडीचा चालक सचिन नागेकर (वय २४) याला फोंडा पोलिसांनी अटक करून नंतर त्याला जामिनावर सोडले. फोंडा पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला असून अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, केशव याच्या अकाली निधनाबद्दल त्याच्या सहकारी कामगारवर्गात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या