
गोवा राज्यात अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतायेत अशी शंका नागरीकातून व्यक्ती केली जात असतानाच आज गोवा राज्यात दोन लैंगिक अत्याचाराच्या घटना उघडकीस आल्या आहेत. यामुळे बार्देश तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकाराने नागरीकांमध्ये दिवसभर एकच चर्चा सुरु आहे.
(Two women are sexually assaulted In Bardez taluka)
आज दुपारच्या दरम्यान दोन तक्रारी दाखल पोलिसात दाखल झाल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिडितांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु आहे. संशयितांचा शोध घेण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत. तसेच या प्रकरणाचा तपास वेगाने लावत गुन्हेगारांना लवकरच गजाआड करण्यात यशस्वी होऊ असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या घटनांबाबत बोलताना एक नागरीक म्हणाला की काल पर्यंत आम्ही हे सारे चित्रपटात पाहत होतो. मात्र आता आम्ही राहत असलेल्या ठिकाणी असे प्रकार घडत असतील गोव्यात महिला सुरक्षित आहेत का? यावर आता सर्व गोवेकरांनी विचार करणे गरजेचे बनले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.