Laterite Stone : उसगावात नियम मोडून चिरे व्यवसाय; दोन युवा ग्रामस्थांनी दाखल केली याचिका

चिरे व्यवसायासंदर्भात ग्रामस्थांनी माहिती हक्क कायद्यानुसार माहिती कागदपत्रे मिळविली
Stone carving
Stone carvingDainik Gomantak

Laterite Stone : म्हारवासडा-उसगाव येथे सर्व कायदेनियमांचे उल्लंघन करून चिरे व्यवसाय सुरू आहे; परंतु संबंधितांवर कारवाई करण्याकडे संबंधित खात्याचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. यासंदर्भात संबंधित खाते व वरिष्ठ सरकारी अधिकारी यांच्याविरोधात उसगावातील दोन युवा ग्रामस्थांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका दाखल केली आहे. तसेच चिरे व्यवसाय सुरू असलेल्या जमीनमालकाला दोन नोटीसा उसगाव पंचायतीतर्फे यापूर्वी देण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती संबंधित सूत्रांकडून देण्यात आली आहे.

म्हारवासडा येथे सुरू असलेल्या चिरे व्यवसायासंदर्भात ग्रामस्थांनी माहिती हक्क कायद्यानुसार माहिती कागदपत्रे मिळविली आहेत. त्यात दिलेली माहिती व तिथे प्रत्यक्षात सुरू असलेला व्यवसाय यात जमीनआसमानाचा फरक ग्रामस्थांना आढळून आला.

Stone carving
Goa Statehood Day: गृहमंत्री शहा, योगी, खट्टर, खांदू, चौहान; गोव्याला घटक राज्याच्या शुभेच्छा देताना कोण काय म्हणाले?

तेथील डोंगर कापून जमीन सपाटीकरण करण्यात आलेली आहे. त्यामुळे पर्यावरण संतुलनाला बाधा आलेली आहे. यासंदर्भात जागृत ग्रामस्थांनी संबंधित खात्याकडे तक्रार दाखल केली असून अधिकाऱ्यांनी संबंधितांवर अद्याप काहीच कारवाई केलेली नाही. म्हणून संबंधित खाते व एक वरिष्ठ अधिकारी यांच्याविरोधात उसगावातील दोन युवा ग्रामस्थांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका दाखल केली असून लवकरच त्याची सुनावणी सुरू होणार आहे, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.

चौपटीने चिरे उत्खनन

या जागेत महिन्याला १,०३,५१८ चिरे काढायला मान्यता दिलेली आहे; परंतु तिथे चौपटीने जास्त चिरे काढले जातात. दर दिवशी प्रत्येक ट्रकमध्ये ३०० चिरे भरून फक्त १४ खेपा मारण्याची मान्यता देण्यात दिलेली आहे; परंतु प्रत्यक्षात प्रत्येक ट्रकमध्ये ७०० चिरे भरून २५ पेक्षा जास्त खेपा मारल्या जातात. याशिवाय इतर बेकायदेशीर व्यवहार तिथे सुरू आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com