
सासष्टी : नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर यानी मतदारसंघातील पाचही पंचायतींच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन मॉन्सूनपूर्व कामांचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, कामे पूर्ण करण्यासाठी पुढाकार घ्या. पंचायतींना त्यासाठी सरकारकडून अनुदान मिळते.
या बैठकीत आमदारांनी लोकांच्या समस्याही जाणून घेतल्या. काही पंचायतींची कामे पूर्ण होणे बाकी आहेत. ही सर्व कामे पुढील आठवड्यापर्यंत पूर्ण केली जातील. पुढील काही दिवसांत परत एकदा आढावा घेतला जाईल असे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय महामार्गावरील गटारे स्वच्छ करण्यासाठी तसेच रस्ते हॉटमिक्स करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम
खाते, बीडीओला सूचना करण्यात आली आहे.
अग्निशमन दलांच्या कर्मचाऱ्यांना बोलावून रस्त्यावर आलेल्या झाडांच्या फांद्या कापल्या जातील. दवर्ली, आके-बायश, रुमडामळ पंचायत क्षेत्रात कचरा गोळा करण्याचे काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे. पुढील एका वर्षांत एमआरएफ शेड पूर्ण होईल अशी माहिती आमदार तुयेकर यांनी दिली.
वीजवाहिन्यांसाठी 87 कोटींची योजना
मांडोपा येथे एक जुना व एक नवीन पूल आहेत. तिथे जो कचरा गोळा झाला आहे तिथून तो हटविण्याचे काम सुरू झाले आहे. भूमिगत वीजवाहिन्या टाकण्यासाठी संपूर्ण मतदारसंघासाठी 87 कोटी रुपयांची योजना मान्यतेसाठी सरकारपाशी आहे.
आपण मुख्यमंत्र्यांशी यासंदर्भात चर्चा केली असून मान्यता देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. शिवाय पाच पंचायत क्षेत्रांत सुमारे दहा ते पंधरा कोटी खर्चून विकासकामे केली जातील, असे तुयेकर यानी सांगितले.
साळपे तळी परिसरातील शेतजमीन स्वच्छ ठेवण्यासाठी सुमारे 5 कोटी रुपयांची योजना आहे. तळीतील सांडपाणी शेतात जाणार नाही यासाठी उपाययोजना केली जाईल. मतदारसंघातील सर्व शेतकऱ्यांना आपला पूर्ण पाठिंबा आहे.
- उल्हास तुयेकर, नावेलीचे आमदार
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.