गोवा जिल्हा पंचायत मतमोजणीत उल्हास तुयेकर, सिद्धार्थ देसाई आघाडीवर

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 14 डिसेंबर 2020

राज्यातील जिल्हा पंचायतींच्या ४८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत २०० उमेदवारांचे भवितव्य आज होणाऱ्या मतमोजणीनंतर ठरणार आहे.

पणजी :  गोवा जिल्हा पंचायत निवडणूकीच्या मतमोजणीला सकाळी ७ वाजल्यापासून सुरूवात झाली असून, दवर्ली मतदारसंघातून उल्हास तुयेकर, शेल्डे मधून सिद्धार्थ देसाई, राय मतदारसंघातून डॉमिनिक गावकर आणि कोलवाळ मधून कविता कांदोळकर आघाडीवर आहेत.

 

राज्यातील जिल्हा पंचायतींच्या ४८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत २०० उमेदवारांचे भवितव्य आज होणाऱ्या मतमोजणीनंतर ठरणार आहे. कोविड काळात झालेल्या या निवडणुकीत मतदारांकडून उत्साह दिसला नसला तरी भाजप व काँग्रेसने दक्षिण व उत्तर गोव्यात बहुमत मिळणार असल्याचा दावा केला आहे. मतांची टक्केवारी घटल्याने मतदारराजाने कल कोणाच्या बाजूने दिला आहे, हे मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. या निकालानंतर पुढील वर्षीच्या पालिका व २०२२ मध्ये विधानसभा निवडणुकीसाठीची तयारी होणार आहे. त्यामुळे या निकालाकडे राजकीय पक्षाचे लक्ष लागून आहे. 

 

वर सुरू होणार आहे. उत्तरेत तिसवाडी, बार्देश - १ व दक्षिणेतील सालसेत - १ केंद्रावर प्रत्येकी पाच मतदारसंघांची तर बार्देश - २, पेडणे, डिचोली, फोंडा - १ या केंद्रांवर प्रत्येकी चार मतदारसंघांची मतमोजणी होणार आहे. त्यामुळे तेथे संध्याकाळी उशिरापर्यंत ही मतमोजणी सुरू राहण्याची शक्यता आहे. इतर केंद्रावर प्रत्येकी प्रत्येकी ३ व २ मतदारसंघांची मतमोजणी होणार असल्याने ती दुपारपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुपारपर्यंत जिल्हा पंचायतीमध्ये कोणाकडे बहुमत झुकले आहे याचा अंदाज येऊ शकतो. 

 

संबंधित बातम्या