कोलवाळ कारागृहाच्या फाटकाकडेच अस्वच्छता

दैनिक गोमन्तक
गुरुवार, 3 डिसेंबर 2020

कोलवाळ येथील केंद्रीय कारागृहाच्या ‘गेट क्रमांक दोन’च्या परिसरात अस्वच्छतेसंदर्भात जागतिक मानवी हक्क मंडळ महिला विभागाच्या राष्ट्रीय अध्यक्ष ऐश्वर्या साळगावकर यांनी ‘आयआरबी’च्या अधीक्षकांना निवेदन सादर केले आहे.

म्हापसा : कोलवाळ येथील केंद्रीय कारागृहाच्या ‘गेट क्रमांक दोन’च्या परिसरात अस्वच्छतेसंदर्भात जागतिक मानवी हक्क मंडळ महिला विभागाच्या राष्ट्रीय अध्यक्ष ऐश्वर्या साळगावकर यांनी ‘आयआरबी’च्या अधीक्षकांना निवेदन सादर केले आहे.

तेथील अस्वच्छता तिथे ड्युटी बजावणाऱ्या आयआरबीच्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्यास अपायकारक असल्याचे त्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या कारागृहावर देखरेख तथा सुरक्षा यासंदर्भातील जबाबदारी आयआरबीवर सोपवण्यात आल्याने हे निवेदन सादर करण्यात असल्याचा उल्लेख करून कर्मचाऱ्यांच्या स्वास्थ्याचा प्रश्न महत्त्वाचा असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.

तिथे ड्युटी बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना गटारांच्या चेंबरवर बसावे लागते व तिथे नेहमीच डासांचा संचार असतो, असे त्या निवेदनवजा तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्या कर्मचाऱ्यांना सेवा बजावताना पूरक वातावरण उपलब्ध असले पाहिजे, असे मत व्यक्त करून उपलब्ध जाचक परिस्थितीत ड्युटी बजावणाऱ्या त्या कर्मचाऱ्यांच्या स्वास्थ्याशी हा विषय निगडित असल्याने या प्रकरणी लक्ष घालावे, अशी विनंती त्या निवेदनातून करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रती राज्यपाल, मुख्यमंत्री, मुख्य सचिव व मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षांच्या कार्यालयांना रवाना करण्यात आल्या आहेत.

संबंधित बातम्या