गिरी येथे ट्रक घरात घुसला

प्रतिनिधी
बुधवार, 23 सप्टेंबर 2020

वांसियोवाडा-गिरी येथील शशिकांत नाईक यांच्या घरात आज मंगळवारी सकाळी ट्रक घुसल्याने घराचे छत, कुंपणाची भिंत, घरातील उपकरणे, घराची कौले इत्यादींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.    

म्हापसा: वांसियोवाडा-गिरी येथील शशिकांत नाईक यांच्या घरात आज मंगळवारी सकाळी ट्रक घुसल्याने घराचे छत, कुंपणाची भिंत, घरातील उपकरणे, घराची कौले इत्यादींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.    

अवर लेडी ऑफ असम्पशन चर्चच्या परिसरात असलेल्या या घराला झालेल्या अपघातामुळे सुमारे तेरा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा घरमालकाने केला आहे.

ट्रकच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे वृत्त आहे. ट्रकचा चालक ट्रकमध्येच झोपलेला होता व क्लिअनर ट्रक चालवत होता.  दोघेही मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत असल्याचे आढळून आल्याने स्थानिकांनी त्यांना पकडून बराच चोप दिला व अ्खेरीस म्हापसा पोलिसांच्या ताब्यात दिले.  आंध्रप्रदेशमध्ये नोंदणीकृत असलेला तो ट्रक म्हापसाहून पणजीच्या दिशेने जात होता. 

अपघाताचा पंचनामा म्हापसा पोलिसांनी केला आहे. दरम्यान, पंचायतीच्या वतीने नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन स्‍थानिक पंचायत सदस्य गेब्रियल फर्नांडिस यांनी घरमालकाला दिले आहे.

घरमालक आर्थिकदृष्ट्या गरीब असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. 

संबंधित बातम्या