Goa Congress : स्मार्ट सिटी प्रकल्पाची न्यायालयीन अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करा; काँग्रेसची मागणी

काँग्रेसचे नेते एल्विस गोम्स यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
Goa Congress Press
Goa Congress PressDainik Gomantak

Goa Congress : पणजीत स्मार्ट सिटीचे काम निकृष्ट दर्जाचे सुरू आहे. निकृष्ट काम होत असल्याने जनतेच्या पैशाची खुलेआम लूट सुरू आहे. या कामाची न्यायालयीन अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे नेते एल्विस गोम्स यांनी केली आहे. यावेळी सरचिटणीस विजय भिके, उत्तर जिल्हाध्यक्ष वीरेंद्र शिरोडकर आणि पणजी गटाच्या महिला अध्यक्ष लविनिया डिकॉस्ता उपस्थित होत्या.

'इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेड'च्या मंडळ सदस्यांचा या 1 हजार 140 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचारात सहभाग असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

Goa Congress Press
Shooting At Vasco : अखेर सुगावा लागला; झुआरीनगर दरोड्याचा प्रयत्न, पोलिसांवर गोळीबार प्रकरणी दिल्लीतून एकाला अटक

‘‘पणजीचे भाजप आमदार आणि महसूल मंत्री बाबुश मोन्सेरात यांनी 'स्मार्ट सिटी'चे सुरू असलेले काम दर्जाहीन असल्याचे मान्य केले आहे. बाबुश मंत्री असल्याने ते या सरकारचा भाग आहेत. सरकारने भ्रष्टाचार कबूल केल्याने संबंधितांवर एफआयआर नोंदवला गेला पाहिजे,” असे गोम्स म्हणाले.

'स्मार्ट सिटीचे काम सुरू असताना जनतेच्या पैशाची खुलेआम लूट सुरू आहे. त्यामुळे सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. बाबुश आणि इतर जे यात गुंतलेले आहेत ते या भ्रष्टाचारापासून सुटू शकत नाहीत,” असे गोम्स म्हणाले.

Goa Congress Press
Goa ST Community Reservation: भाजपमुळे आमच्यावर आरक्षणासाठी उपोषण करण्याची वेळ; ‘एसटी’ नेत्यांचा आरोप

“स्मार्ट सिटीच्या प्रकल्पाबाबतचे सर्व अधिकार स्मार्ट सिटी मंडळाकडे आहेत. मुख्य सचिव, जे राज्याचे मुख्य दक्षता अधिकारी आहेत ते त्याचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे सरकार कोणावर कारवाई करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. आमदार बाबुश मंडळावर आहेत आणि त्यांचा महापौर मुलगा सुद्धा मंडळावर आहे. ते सर्व या भ्रष्टाचारात सहभागी आहेत,” असे गोम्स म्हणाले.

“या भ्रष्टाचार प्रकरणात आम्ही कारवाईची मागणी करतो. करदात्यांच्या पैशांची दिवसाढवळ्या लूट केली जात आहे. हा 1140 कोटींचा घोटाळा आहे. याची चौकशी करण्यासाठी सरकारने काय केले आहे,’’ असा सवाल त्यांनी केला.

अशा मोठ्या प्रकल्पांची कामे सुरू असताना विकासाची माहिती जनतेला देणे हे संबंधित मंडळाचे कर्तव्य आहे, याकडे गोम्स यांनी लक्ष वेधले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com