पाटणे-कोळंब किनाऱ्यावर सापडला अज्ञाताचा मृतदेह

पाटणे-कोळंब किनाऱ्यावर सापडला अज्ञाताचा मृतदेह
An unidentified body was found on the shores of Patne Colombo

काणकोण: काणकोणात पाटणे-कोळंब किनाऱ्यावर काल सकाळी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला. तो  मृतदेह पुरूषाचा असून 30 ते 35 वयोगटातील तो व्यक्ती असल्याचे सांगितले जात आहे, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतदेह सडलेल्या अवस्थेत आहे.

स्थानिकांनी माहिती देताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो मडगाव येथील टी.बी. इस्पितळाच्या शवागरात ओळख पटवण्यासाठी ठेवला आहे. काणकोणात कोणीही व्यक्ती बेपत्ता असल्याची अद्याप तक्रार नाही. ती व्यक्ती कर्नाटकातील असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. काणकोण पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक रिफा बार्रेटो पुढील तपास करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com