अचानक उद्भवलेल्या वादातून एकाला जिवंत जाळले

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 15 ऑक्टोबर 2020

या प्रकरणातील आरोपींचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना दिले आहेत. 

पणजी-  म्हापसा राष्‍ट्रीय महागार्गावर काल रात्री गाडी थांबवून एकाला पेटवून देण्याचा प्रकार घडला आहे. विलास मेथर असे या घटनेतील मृताचे नाव असून गोव्याच्या शासकीय रूग्णालयात उपचारांसाठी दाखल केले असता तेथे त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणातील आरोपींचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना दिले आहेत. 

दरम्यान, पर्वरी येथील विलास मेथर हे गाडीने घरी परतत होते. तोर्डा येथे दोघा तरुणांनी त्यांना थांबविले व बाचाबाची करण्यास सुरुवात केली. यावेळी त्या तरुणांनी पेट्रोल मिश्रित पदार्थ अंगावर फेकले विशालला पेटवून दिले. प्रसंगावधान राखून पेटलेल्या स्थितीत मेथर याने गाडीतून बाहेर येत बाजूला असलेल्या शेतातील पाण्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. यावेळी रस्त्याने जाणाऱ्या वाहन चालकांनी पाहिले व त्याच्या मदतीला धावले व रुग्णवाहिकेने त्याला गोमेकॉ इस्पितळात दाखल केले होते. त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पर्वरी पोलिसांनी दोघा अज्ञातांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
 

संबंधित बातम्या

Tags