पाच दुकानें फोडून अज्ञात चोरट्यांचे गोवा पोलिसांना आव्हान

दैनिक गोमन्तक
शनिवार, 28 नोव्हेंबर 2020

गोव्याचे वीजमंत्री तथा कुडचडेचे आमदार निलेश काब्राल वास्तव करीत असलेल्या इमारतीच्या तळमजल्या खालील व मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेल्या पाच दुकानाची शटर बेंड करून आतील रोख रक्कम घेऊन चोरटयांनी पोबारा करण्याची घटना घडल्याने कुडचडे बाजारात खळबळ माजली आहे. 

कुडचडे: कुडचडे बाजारातील एकूण पाच दुकानें अज्ञात चोरट्यांनी फोडून पोलिसांना आव्हान निर्माण केले आहे तर सर्व सामान्य कुडचडेवासियांची झोपमोड केली असल्याने पोलिसांच्या रात्री केल्या जाणाऱ्या पेट्रोलिंग संदर्भात नागरिक प्रश्न विचारू लागलें असुन गोव्याचे वीजमंत्री तथा कुडचडेचे आमदार निलेश काब्राल वास्तव करीत असलेल्या इमारतीच्या तळमजल्या खालील व मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेल्या पाच दुकानाची शटर बेंड करून आतील रोख रक्कम घेऊन चोरटयांनी पोबारा करण्याची घटना घडल्याने कुडचडे बाजारात खळबळ माजली आहे. 

तुलसी विवाह असल्यामुळे दुकानदार आपली आस्थापने लवकर बंद करून गेले होते याचा फायदा चोरटयांनी घेत मोठी रक्कम मिळेल या आशेवर एकूण पाच दुकानें फोडण्यात आली. मोठी रक्कम हाती लागली नसली तरी सद्याच्या परिस्थितीत हिच रक्कम मोठी वाटत आहे. चोरीची घटना नेमकी किती वाजता घडली ते समजू शकले नसले तरी जवळ असलेल्या खाजगी आस्थापनाच्या सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झाल्यास या चोरीचा मागमूस लागण्याची शक्यता आहे. 

फोडण्यात आलेल्या दुकानदारा पैकी बेंगलोर बेकरी अंदाजे साडे पाच हजार, गिरीश मेटल मार्ट चे अंदाजे सात हजार, सतीश नाईक यांची सहा हजार व दोन चांदीची नाणी व इतर दोघा जणांच्या दुकानाची शटर उघडली पण हाती काही लागलें नाही. चोरटयांनी रक्कम शिवाय अन्य सामानाला हात लावलेला नाही केवळ पैसे हडप करण्याच्या इराद्याने चोरी केल्याचे स्पष्ट होत आहे. घटनेची माहिती मिळताच दुकानदारांनी आपल्या दुकानात चोरी झाल्याची रीतसर तक्रार कुडचडे पोलीस स्थानकात नोंद केली. त्या नंतर कुडचडे पोलीस निरीक्षक रवींद्र देसाई यांनी आपली तुकडी घेऊन घटनेची पहाणी करून पंचनामा केला असता आपण या चोरीचा छडा लावणार असुन ठसे तज्ञ् व स्वान पथक बोलावून धागेदोरे मिळविण्याचा प्रयत्न केला. 

वीजमंत्री निलेश काब्राल ज्या इमारतीत राहतो त्या इमारतीच्या तळमजल्यावरील दुकानें फोडण्यात आली. जर मंत्री रहात असलेल्या इमारतीच्या तळमजला खाली मंत्र्याची सुरक्षा म्हणून रात्रपाळी साठी दोन पोलीस शिपाई असल्यास ही चोरी त्या ठिकाणी झाली नसती. पण वीजमंत्री पोलीस सुरक्षा घेत नाही. शिवाय कुडचडे पोलीस दिवसभर खनिज वाहतुकीला शिस्त आणण्यासाठी, बेशिस्त वाहतुकीला लगाम घालण्यासाठी, तालांव सत्र राभविण्यासाठी राबत असतात म्हणून कदाचित रात्रीचे पेट्रोलिंग कमी झाले असेल म्हणून मुख्य रस्त्याच्या अन मंत्री रहात असलेल्या इमारतीतील दुकानात चोरी झाली असेल अश्या संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत होते. 

कुडचडे बाजारातील नागरिक या घटनेचा कुडचडे पोलीस कश्या प्रकारे शोध लावणार या गोष्टीकडे लक्ष ठेऊन आहे. दरम्यान या घटनेने इतर व्यापारी लोकात घबराट पसरली असुन आपल्या आस्थापनाची काळजी घेण्यासाठी स्वतः उपाय योजना आखण्याच्या विचारात आहे. 

संबंधित बातम्या