Union Budget 2021: संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी अर्थसंकल्पाचे केले स्वागत

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 1 फेब्रुवारी 2021

या अर्थसंकल्पामुळे शेतकरी, सामान्य जनता, व्यापारी लोकं, मजूर आणि समाजातील सर्व वेगवेगळ्या क्षेत्रांच्या जीवनात आर्थिक बदल घडतील असे मत संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केले.

पणजी: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मनिर्भर भारत 2021 या वर्षातील अर्थसंकल्प आज संसदेत सादर केला.

या अर्थसंकल्पामुळे शेतकरी, सामान्य जनता, व्यापारी लोकं, मजूर आणि समाजातील सर्व वेगवेगळ्या क्षेत्रांच्या जीवनात आर्थिक बदल घडतील असे मत संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केले. ते सध्या गोमकॉ इस्पितळात उपचार घेत आहेत.  ते म्हणाले, "या क्रांतिकारक बजेटबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचे आभार मानतो आणि 2021-22 च्या अर्थसंकल्पाचे मनापासून स्वागत करतो."

गोवा सरकारने कर्नाटकला म्हादई नदी विकली -

संबंधित बातम्या