'मोप'च्या प्रस्तावित हरित आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला तीन महिन्यांची मुदतवाढ

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 13 जानेवारी 2021

पेडणे तालुक्यातील मोप येथील प्रस्तावित हरित आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला केंद्र सरकारने तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.

पणजी :  पेडणे तालुक्यातील मोप येथील प्रस्तावित हरित आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला केंद्र सरकारने तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. खासगी आणि सार्वजनिक भागीदारीतून बांधा वापरा हस्तांतरित करा या तत्त्वावर हा विमानतळ बांधला जात आहे. जी एम आर या कंपनीकडे सरकारने हे काम सोपवले आहे. करारानुसार मे 2022 मध्ये हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते मात्र कोरोनाच्या महामारीच्या काळात प्रकल्पाचे काम बंद पडल्याने केंद्र सरकारने आता तीन महिन्यांची मुदतवाढ कंपनीला दिली आहे.

गोवा सरकारची मागणी असलेल्या खाण व खनिज कायद्याच्या दुरुस्तीवर उद्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा

यामुळे ऑगस्ट 2022 मध्ये या विमानतळाचे काम पूर्ण होणे आता अपेक्षित आहे. उत्तर गोव्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेलगत हा प्रकल्प आकाराला येत आहे. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालय आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकल्पाचे सध्या 20 टक्के काम पूर्ण झाले आहे. प्रकल्प सुरू झाल्यापासून तीन वर्षात काम पूर्ण करणे कंपनीवर बंधनकारक आहे.

कोरोनाची कोवीशिल्ड लस गोव्यात पोहोचली

मध्यंतरी काम बंद पडल्यामुळे मुदतवाढ मिळावी अशी मागणी करण्यात आली होती, त्याला आता मंजुरी मिळाली असून काम पूर्ण करण्यात आणखी नव्वद दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. सध्या गोव्यात दाबोळी येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. तो नौदलाच्या ताब्यात असल्याने नागरी हवाई वाहतुकीवर मर्यादा आहेत. आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर वरचे स्थान असलेल्या गोव्यास त्यमुळे स्वतंत्र आंतरराष्ट्रीय विमानतळ हवा आहे.

संबंधित बातम्या