केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग गोव्यात दाखल

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 12 जानेवारी 2021

 केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग गोमेकॉ इस्पितळात पोहचले.

पणजी :  केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग गोमेकॉ इस्पितळात पोहचले. सध्या गोवा दौऱ्यावर असलेले उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू तसेच दिल्लीहून केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांच्या प्रकृतीच्या चौकशीसाठी बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात पोहचले आहेत. यावेळी चोख पोलिस बंदोबस्त  ठेवण्यात आला आहे.

उपराष्ट्रपती दुरपारी अडीच च्या दरम्यान बांबोळी येथिल  गोमेकॉ इस्पितळात पोहचणार आहे.  सध्या केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग केंद्रीय आयुषमंत्री तथा संरक्षण राज्‍यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या भेटीस अडीच च्या दरम्यान पोहचले आहे. केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक अपघातात गंभीर जखमी झाले असून त्यांच्या पत्नी विजया व त्‍यांच्‍यासोबत गाडीतून प्रवास करणारे डॉ. दीपक घुमे हे ठार झाले. जखमी नाईक यांना रात्री पावणे बारा वाजण्‍याच्‍या दरम्‍यान अधिक उपचारासाठी ‘गोमेकॉ’त हलवण्यात आले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीपाद नाईक हे कर्नाटकात गेले होते. ते यल्लापूर येथील एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यांनी शिर्शीच्या गणपती देवस्थानात जाऊन दर्शनही घेतले होते. ते यल्लापूर गोकर्ण राष्ट्रीय महामार्ग क्र. ६३ मार्गे येताना होस्कुंबी, शिरूरमार्गे गोकर्णकडे निघाले असता त्यांच्या कार ला अपघात झाला.

आणखी वाचा:

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक गंभीर जखमी - 

संबंधित बातम्या