'गोवा मुक्ती'चे 60 वे वर्ष..केंद्रीय पर्यटन व संस्कृतिक मंत्री प्रल्हादसिंग पटेल प्रमुख अतिथी

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 15 नोव्हेंबर 2020

केंद्रीय पर्यटन व संस्कृतिक मंत्री प्रल्हादसिंग पटेल हे 19 डिसेंबर रोजी गोवा मुक्ती दिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी असतील, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.

पणजी :  केंद्रीय पर्यटन व संस्कृतिक मंत्री प्रल्हादसिंग पटेल हे 19 डिसेंबर रोजी गोवा मुक्ती दिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी असतील, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले. गोव्यातील केंद्र सरकारने अनुदानीत केलेल्या दोन पर्यटन प्रकल्पांचे काम वेगवान करण्यासाठीदेखील पटेल यांच्याशी चर्चा केली असल्याचं सावंत म्हणाले.

गोव्याला मुक्ती मिळून साठ वर्षे पूर्ण होत आहेत, यानिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे निमंत्रण पटेल यांनी स्विकारले असून, ते या कार्यक्रमास पूर्णवेळ उपस्थित असतील, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. सावंत यांनी त्यांच्या दिल्ली दौऱ्यात केंद्रीय पर्यटन व संस्कृतिक मंत्री प्रल्हादसिंग पटेल यांच्याशी प्रामुख्याने डिचोली-साखळी-बोंडला सर्किट व जुना गोवा सर्किट या दोन पर्यटन प्रकल्पांबद्दल चर्चा केली.
 

संबंधित बातम्या